|
भोपाळ (मध्यप्रदेश)- येथील बरकतुल्ला विद्यापिठात रामायणातील सुंदरकांडाचे पठण करणे आणि मंदिरात दर्शनासाठी जाणे, यांवरून वाद निर्माण झाला आहे. विद्यापिठाच्या मुख्य अधिकारी (वॉर्डन) आयशा रईस यांच्या आदेशानुसार हिंदु विद्यार्थ्यांना सुंदरकांडाचे पठण करणे आणि मंदिरात जाणे यांवर बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार आयशा यांनी सांगितले होते की, ‘जर त्यांना मंदिरात जायचे असेल, तर त्यांना प्रथम विद्यापीठ प्रशासनाची अनुमती घ्यावी लागेल, तसेच आदेशाचे उल्लंघन केल्यास क्षमा मागावी लागेल.’ या प्रकरणावरून विद्यापिठात गदारोळ झाला आहे. या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे.
🚨Hindu students made to apologize for visiting temple, and reciting Sundarkand from Ramayan, by Hostel warden Ayesha Rais of Barkatullah University, Bhopal, Madhya Pradesh
👉 This makes one wonder if Bhopal is in #India or #Pakistan? When it’s a #BJP ruled State, the #Hindus… pic.twitter.com/a0RnIVTJTM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 11, 2024
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविपने) या निर्णयाला विरोध केला आहे. परिषदेच्या विद्यार्थ्यांनी विद्यापिठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर जमून श्रीरामनामाचा जप केला आणि विद्यापीठ प्रशासनाला या सूत्राची योग्य नोंद घेण्याचे आवाहन केले. या प्रकरणात योग्य ती कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, अशी चेतावणी अभाविपने दिली आहे.
आयेशा रईस यांचे स्पष्टीकरण !
आयेशा रईस यांनी या संदर्भात निवेदन प्रसारित केले आहे. त्या म्हणाल्या की, हे धार्मिक सूत्र नाही. हे सूत्र कुठे जाण्याविषयी नाही, तर शिस्तीचे आहे. कुलगुरूंनी एक समिती स्थापन केली आहे. ती चौकशी करील. विद्यार्थी आमच्या मुलांप्रमाणे आहेत. त्यांना काहीही होऊ नये. ते त्यांच्या आई-वडिलांपासून दूर येथे रहातात. आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. आम्ही त्यांना संरक्षण देतो, जेणेकरून ते आनंदाने त्यांचा अभ्यास करू शकतील.
संपादकीय भूमिका
|