रामनवमीच्या शुभमुहूर्तावर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी मध्यप्रदेशमधील उज्जैन, इंदूर, भोपाळ आणि ग्वाल्हेर येथे धर्मप्रेमींनी केली सामूहिक प्रार्थना !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाला प्रारंभ

कटनी (मध्यप्रदेश) येथे रेल्वे स्थानक परिसरातील जुन्या श्रीराममंदिराच्या समोरील भिंत हिंदु संघटनांनी पाडली !

कटनी येथील रेल्वे स्थानक परिसरातील जुन्या श्रीराममंदिराच्या समोर रेल्वे प्रशासनाने काही वर्षांपूर्वी भिंत उभी केली होती. त्यामुळे भाविकांना मंदिरात जाण्यास अडचण निर्माण झाली होती.

फेसबूकवर ‘जय श्रीराम’ लिहिल्याने भोपाळमध्ये भाजप समर्थक मुसलमानाला त्याच्या धर्मबांधवांकडून मारहाण

एकीकडे हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजले जातात, तर दुसरीकडे धर्मांध मात्र हिंदूंवर आणि हिंदूंचे समर्थन करणार्‍या त्यांच्याच धर्मबांधवांवर अशा प्रकारे आक्रमण करतात ! हे निधर्मीवाद्यांना दिसत नाही का ?

हिंदु संघटनांनी मतभेद बाजूला ठेवून हिंदु राष्ट्रासाठी संघटित व्हावे ! – अतुल जेसवानी, प्रदेशाध्यक्ष, हिंदु सेवा परिषद

आज हिंदु समाजात अभूतपूर्व जागरूकता निर्माण झाली आहे. याला आपण प्रतिकूल काळातील अनुकूलता म्हणू शकतो. अशा काळात जागरूक हिंदूंना राजकारणाकडे नाही, तर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने नेण्यासाठी आपल्याला जागृती करावी लागेल.

मध्यप्रदेशात काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती साजरी करण्याचा आदेश

काँग्रेसला आता कळून चुकले आहे की, इफ्तारच्या मेजवान्या करून पुन्हा सत्ता मिळवता येणार नसल्याने आता हिंदूंना खूश करण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न करणे आवश्यक आहे; मात्र हिंदूंना ‘काँग्रेसची ही ढोंगबाजी आहे’, हे ठाऊक आहे !

म. गांधी यांच्यावरील विधानाविषयी पश्‍चात्ताप नाही ! – कालीचरण महाराज

कलियुगात सत्य बोलल्यामुळे मला शिक्षा झाली आहे, असे विधान कालीचरण महाराज यांनी जामिनावर सुटल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देतांना केले.

दमोह (मध्यप्रदेश) येथे धर्मांध सासर्‍याकडून सुनेवर बलात्कार

एरव्ही शरियत कायदा लागू करण्याची मागणी करणारे अशा घटनांविषयी आरोपीला शरियत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची, तसेच चौकात बांधून त्याला दगड मारण्याची शिक्षा देण्याची मागणी करत नाहीत !

हिंदूंनी अत्याचार न विसरता अन्यायाच्या विरोधात लढायला शिकावे ! – कपिल मिश्रा, माजी आमदार आणि संस्थापक अध्यक्ष, हिंदु इकोसिस्टीम

हिंदु राष्ट्रासाठी आज प्रत्येक हिंदूने सक्षम बनले पाहिजे. प्रत्येक हिंदु मनामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेची ज्योत प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करूया.

हिंदु राष्ट्राचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून करावा ! – श्री श्री १०८ महंत श्री योगेश्वर दास महाराज

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने इंदूर येथे ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. या अधिवेशनाला अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी विविध मान्यवरांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा निर्धार केला.

धर्मांध पतीकडून तिहेरी तलाक देऊन हिंदु पत्नीवर ‘हलाला’साठी दबाव !

लव्ह जिहादच्या आणखी किती घटना घडल्यावर हिंदु महिला जाग्या होणार आहेत ? आणि लव्ह जिहाद रोखण्यासाठी सरकार देशपातळीवर कधी कायदा करणार आहे ?