फेसबूकवर ‘जय श्रीराम’ लिहिल्याने भोपाळमध्ये भाजप समर्थक मुसलमानाला त्याच्या धर्मबांधवांकडून मारहाण

  • समर्थकाच्या ४ वर्षांच्या मुलाला उंचावरून खाली फेकले !

  • घराचीही तोडफोड

एकीकडे हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजले जातात, तर दुसरीकडे धर्मांध मात्र हिंदूंवर आणि हिंदूंचे समर्थन करणार्‍या त्यांच्याच धर्मबांधवांवर अशा प्रकारे आक्रमण करतात ! हे निधर्मीवाद्यांना दिसत नाही का ? – संपादक

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील भाजपचे आमदार रामेश्‍वर शर्मा यांचे समर्थक असणारे मुनव्वर अन्सारी यांनी शर्मा यांच्या फेसबूक पोस्टवर ‘जय श्रीराम’ लिहिल्याने त्यांना आणि त्यांच्या पत्नीला धर्मबांधवांनी मारहाण केली. तसेच अन्सारी यांच्या ४ वर्षांच्या मुलाला उंचावरून खाली फेकले. त्याला पायाने चिरडण्याचा प्रयत्न केला. ते अन्सारी यांना ‘मुसलमानद्रोही’ असे म्हणत होते. त्यांच्या घराचीही तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत. या प्रकरणी आमदार शर्मा यांनी ‘पोलिसांनी चौकशी करून कारवाई केली जावी’, अशी मागणी केली आहे.

१. अन्सारी यांचे शेजारी सोहेल अहमद यांनी त्यांची पोस्ट वाचून ‘अन्सारी हे हिंदुत्वनिष्ठ नेत्याचे समर्थन करत असून ते धर्माचा विश्‍वासघात करत आहेत’, अशी माहिती गावभर पसरवली. त्यानंतर परिसरातील रहमत मशिदीत आरोपींनी अन्सारी यांना धडा शिकवण्याचे ठरवले. त्यानंतर १५ जण अन्सारी यांच्या घरी पोचले आणि त्यांनी त्यांना मारहाण केली. ‘आता बजरंग दलाच्या लोकांना बोलवा’, असे ते म्हणत होते.

२. अन्सारी म्हणाले, ‘‘आता आरोपी आम्हाला परिसर सोडून जाण्याच्या धमक्या देत आहेत. ‘वस्तीत रहाणे कठीण करून टाकू’, अशी धमकीदेखील आम्हाला मिळत आहे.’’

पोलिसांना संपर्क करूनही ते घटनास्थळी न येता आरोपीच्या कार्यालयाचा गेल्याचा आरोप !

‘मध्यप्रदेशात भाजपचेच सरकार असतांना पोलीस अशा प्रकारे वागत असतील, तर जनतेचे रक्षण कोण करणार?’, असा प्रश्‍न जनतेला पडतो ! – – संपादक

मारहाणीच्या वेळी मुनव्वार अन्सारी यांच्या अन्य एका मुलाने पोलिसांना दूरभाष करून घटनेची माहिती दिली. पोलीस या भागात आले; मात्र आरोपींपैकी एक असलेल्या सोहेल याच्या कार्यालयात चहापाणी करून गेले, असा आरोप अन्सारी यांनी केला.