परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाला प्रारंभ
भोपाळ (मध्यप्रदेश) – हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्थान आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत १० एप्रिल या दिवशी मध्यप्रदेशातील उज्जैन येथील शक्तिपीठ श्री हरसिद्धिदेवी, बांगर येथील श्रीराम मंदिर, ग्वाल्हेर येथील खासगीवाले रामजानकी मंदिर, साईंनाथ कॉलनी इंदूर येथील राममंदिर; गुरुबक्षकी तलैय्या आणि भेल, भोपाळ येथील श्रीराम मंदिर येथे हिंदु राष्ट्रासाठी सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपस्थित भाविकांनी प्रार्थनेमध्ये सहभाग घेतला. देवास येथे श्रीक्षेत्र बांगर दत्त मंदिराचे व्यवस्थापक पुजारी श्री. दत्तप्रसाद कुलकर्णी यांनी येथील श्रीराम मंदिरात उपस्थितांकडून हिंदु राष्ट्रासाठी प्रार्थना करून घेतली.
राजस्थान येथे सामूहिक प्रार्थना !
सोजत सिटी (राजस्थान) – येथील काला गोरा भेरुजी मंदिर आणि श्री महालक्ष्मी मंदिरात सामूहिक प्रार्थना करण्यात आली. भेरूजी मंदिरात झालेल्या सामूहिक प्रार्थनेला विश्व हिंदु परिषदेचे श्री. उम्मेद सिंह (चंडावल गाव), अधिवक्ता हिरालाल काटे, बजरंग दलाचे श्री. कैलाश चावला यांची उपस्थिती होती. श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रार्थनेच्या वेळी श्री. चंदन बब्बानी, व्यावसायिक श्री. शांतिलाल जांगीड, धर्मप्रेमी सर्वश्री कमल वैष्णव, भंवरलाल प्रजापत, मुकेश गोस्वामी, महेंद्र मालवीय उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती अर्चना लढ्ढा आणि श्री. दीपक लढ्ढा यांनी उपस्थितांकडून प्रार्थना करवून घेतली.