सनातनची अमूल्य ग्रंथसंपदा बेळगाव शहरातील ५ मुख्य वाचनालयात उपलब्ध !

बेळगाव सिटी सेन्ट्रल लायब्ररीच्या कक्षेत बेळगाव जिल्ह्यातील २७ ग्रंथालये येतात. ‘या सर्व ग्रंथालयांसाठी आम्ही सनातनचे ग्रंथ उपलब्ध करून देऊ’, असे आश्‍वासन श्री. रामय्या जी. यांनी दिले.

निष्पापांना गुंतवण्याचा डाव ! – अधिवक्ता शरदचंद्र मुंदरगी

‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध करण्यासाठी प्रकाश चित्रपटगृहासमोर पेट्रोलबॉम्ब टाकल्याचे प्रकरण : राजकीय दबावापोटी या प्रकरणाशी संबंधित नसलेल्या निष्पापांना गुंतवण्याचा पोलिसांचा डाव आहे, असा युक्तीवाद शरदचंद्र मुंदरगी यांनी केला.

हिंदु जनजागृती समितीच्या विरोधानंतर बेंगळूरू येथील ‘मंगळसूत्रासह नग्नता’ हे चित्रप्रदर्शन रहित

येथे २२ ते ३१ मार्चपर्यंत चित्रकला परिषद आयोजित करण्यात आली आहे. या चित्रकला परिषदेत चित्रकार सुजितकुमार मंड्या यांनी ‘मंगळसूत्रासह नग्नता’ या विषयावर चित्रप्रदर्शित केले होते. (‘हिजाबसह नग्नता’, ‘क्रॉससह नग्नता’ असा आशय घेऊन चित्रप्रदर्शन घेण्याचे धारिष्ट्य असे चित्रकार दाखवतील का ?

होळी आणि रंगपंचमीनिमित्त बेळगाव येथे मद्यविक्रीवर निर्बंध

होळी आणि रंगपंचमी उत्सव शांततेत पार पडण्यासाठी बेळगाव शहर आणि तालुक्यात २० मार्चला दुपारी २ पासून २१ मार्चच्या मध्यरात्री १२ पर्यंत मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र येथे निवेदन !

होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखणे, तसेच ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ निर्मित ‘सर्फ एक्सेल’च्या विज्ञापनामधून हिंदूंच्या भावना दुखावणारे विज्ञापन रोखले जावे यासाठी कर्नाटक राज्यात हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने गोकाक, बेळगाव, रायबाग येथे निवेदन देण्यात आले.

बेळगावमधील सैनिक राहुल शिंदे पश्‍चिम बंगालमध्ये हुतात्मा

पश्‍चिम बंगालच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणात बेळगावमधील खानापूर तालुक्यातील झाडनावगा येथील सैनिक राहुल वसंत शिंदे (वय २४ वर्षे) हे हुतात्मा झाले आहेत. १७ मार्च या दिवशी सकाळी सहाच्या सुमारास हे आक्रमण झाले होते.

किन्नीगोळी (कर्नाटक) येथील संत प.पू. देवबाबा यांच्या निवासस्थानी वसंतपंचमीला नागपूजेच्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधिकांकडून गायनसेवा सादर !

प.पू. देवबाबा यांच्या निवासस्थानी नागबन (नागांचे वारूळ) आहे. प्रतिवर्षी वसंतपंचमीच्या दिवशी त्या ठिकाणी मोठा उत्सव असतो.

श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम बनगे यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण !

हजेरी लावण्यासाठी एखाद्या व्यक्तीस उशीर झाला म्हणून त्याला काठीने मारण्याचा अधिकार पोलिसांना कोणत्या कायद्याने दिला ? अर्थात काँग्रेस-जेडी(एस्) यांच्या राज्यात पोलिसांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा ती काय करणार ?

स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक ! – सौ. उज्ज्वला गावडे, रणरागिणी शाखा

भारतीय संस्कृतीत महिलांना मानाचे स्थान आहे; परंतु सध्या बलात्कार, कौटुंबिक छळ यांच्याच जोडीला मुली आणि विवाहित महिलासुद्धा ‘लव्ह जिहाद’सारख्या महाभयंकर षड्यंत्राला बळी पडत आहेत. हिंदु महिला धर्माचरणापासून दूर जात असल्यामुळे स्वैराचार, अमली पदार्थांचे सेवन अशा अनेक घटना घडत आहेत.

(म्हणे) ‘काँग्रेस सरकारच्या १० वर्षांच्या काळात १२ ‘एअर स्ट्राईक!’ – काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांचा दावा

काँग्रेस आघाडी सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात १२ ‘एअर स्ट्राईक’ करण्यात आले; मात्र आम्ही कधी याचे राजकारण केले नाही, असे विधान काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now