सरकारी योजनेतील तांदळाची अवैध वाहतूक करणार्‍या कलंदर शफी आणि उबैदुल्ला यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

उडुपी (कर्नाटक) येथील घटना

तहसीलदार डॉ. प्रतिभा आर्. यांनी जप्त केलेले ‘अन्नभाग्य योजने’चे तांदूळ (छायाचित्र सौजन्य : U PLUS TV)

उडुपी (कर्नाटक) – शहरातील कापू पेठेत एका रिक्शातून अवैधपणे वाहतूक करत असलेले ‘अन्नभाग्य योजने’चे २५० किलो तांदूळ तहसीलदार डॉ. प्रतिभा आर्. यांनी जप्त केले. याप्रकरणी रोपी कलंदर शफी आणि उबैदुल्ला यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रवाशांच्या रिक्शामध्ये वाहतूक करत असलेल्या ६ पोत्यांमधील २५० किलो तांदूळ जप्त करण्यात आले आहेत. तांदळाचे अनुमाने मूल्य ८ सहस्र ५०० रुपये आहे.

कलंदर शफी आणि उबैदुल्ला यांची चौकशी केली असता, त्यांनी हे तांदूळ रेशनधारकांकडून २० रुपये दराने खरेदी करून अधिक किमतीने विक्री करण्यासाठी ते घेऊन जात असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.

काय आहे ‘अन्न भाग्य योजना’ ?

‘अन्न भाग्य योजना’ ही कर्नाटक सरकारची एक महत्त्वाची योजना असून तिचा उद्देश दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना अन्न सुरक्षा प्रदान करणे, हा आहे. या योजनेद्वारे गरीब लोकांना अल्प दरात किंवा विनामूल्य धान्य दिले जाते.

संपादकीय भूमिका

देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीच्या प्रत्येक क्षेत्रात बहुसंख्य असतात. तरीही काँग्रेस त्यांचेच लांगूलचालन करते. यातून काँग्रेसला देशाला ‘गुन्हेगारांचे आगर’ बनवायचे आहे, असे कुणी म्हटल्यास चूक नाही !