(म्हणे) ‘या देशात मुसलमान समाजाविरुद्ध प्रतिदिन द्वेष पसरवण्याचे काम नियोजनबद्धपणे होत आहे !’ – मीनाक्षी श्रीनिवास

बेंगळुरूत इफ्तारची मेजवानी दिल्यानंतर मीनाक्षी श्रीनिवास यांचे संतापजनक कथन

मीनाक्षी श्रीनिवास (डावीकडे) व त्यांनी दिलेली इफ्तारची मेजवानी (उजवीकडे)

बेंगळुरू (कर्नाटक) – आपल्या देशात मुसलमान समाजाच्या विरोधात प्रतिदिनच द्वेष पसरवण्याचे काम नियोजनबद्धपणे चालू आहे. आपण सर्व जण माणसे आहोत. आपापसांत प्रेमाने राहून, एकत्र येऊन देश घडवायला हवा. समाजात द्वेष पसरवणारे लोक अल्प असले, तरी त्याचे परिणाम मोठे आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी एकजुटीने पुढे जावे आणि समाजात प्रेमाचा संदेश द्यावा, असे वक्तव्य स्वत:ला श्रीरामाच्या भक्त म्हणवणार्‍या मीनाक्षी श्रीनिवास यांनी बेंगळुरूमध्ये मुसलमानांसाठी इफ्तार आयोजित करतांना केले.

येथील ‘सेंट मार्क्स रस्त्या’वरील आशीर्वाद सभागृहामध्ये ‘देशात मुसलमानांच्या विरोधात कथितपणे चालू असलेल्या द्वेषपूर्ण वक्तव्यां’ना विरोध करण्याच्या उद्देशाने मूळच्या तामिळनाडूच्या असलेल्या मीनाक्षी श्रीनिवास यांनी तिसर्‍यांदा अशा प्रकारे ‘अम्मांची इफ्तार पार्टी’ आयोजित केली होती. यामध्ये हिंदु-मुसलमानांसह ख्रिस्ती समाजातील लोकांनीही सहभाग घेतला. या प्रसंगी मीनाक्षी श्रीनिवास म्हणाल्या की, ही आमच्या कुटुंबाने मुसलमान बांधवांसाठी तिसर्‍यांदा आयोजित केलेली इफ्तार पार्टी आहे.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे वक्तव्य करणार्‍या आणि इफ्तार आयोजित करणार्‍या मीनाक्षी श्रीनिवास या एकतर अज्ञानी आहेत अथवा हिंदुविरोधी कथानकाला बळी पडल्या आहेत, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक काय ?