बंगालमध्‍ये हिंदूंवर होणारे अत्‍याचार हिंदु समाज खपवून घेणार नाही ! – संत रामबालक दास महात्‍यागी

संत रामबालक दास महात्‍यागी

पखंजूर (छत्तीसगड) – बंगालमध्‍ये हिंदूंवर होणारे अत्‍याचार हिंदु समाज कदापि खपवून घेणार नाही, अशी गर्जना संत रामबालक दास महात्‍यागी यांनी ‘हिंदु संगम’ मेळाव्‍यात बोलतांना केली. छत्तीसगडमधील पखंजूर हा बंगाली समाजाचा मुख्‍य गड राहिला आहे. या भागातील सुमारे ५० गावांतील हिंदूंनी मेळाव्‍यात सहभागी होण्‍यासाठी त्‍यांचा व्‍यवसाय बंद ठेवला होता. या विशाल मेळाव्‍यात मध्‍यप्रदेश, महाराष्‍ट्र  आणि छत्तीसगड या राज्‍यांतील २० सहस्रांहून अधिक लोक जमले होते. छत्तीसगडचे क्रांतीसंत रामबालक दास महात्‍यागी म्‍हणाले की, आज जर आपण जागे झाले नाही, तर भविष्‍यात हिंदूंची संख्‍या होईल; म्‍हणून संघटित होऊन आवाज उठवा.

१. संत महात्‍यागी यांनी बांगलादेशालाही चेतावणी देतांना सांगितले की, आमच्‍या (हिंदूंच्‍या) उपकारावर जगणारे आमच्‍यावर अत्‍याचार करू लागले, तर हिंदु  समाज ते खपवून घेणार नाही आणि त्‍यांचे संपूर्ण अस्‍तित्‍व पुसून टाकले जाईल.

२. छत्तीसगडमध्‍ये ‘लव्‍ह जिहाद’,  हिंदूंचे धर्मांतर आणि आदिवासी समाजाला हिंदु धर्मापासून दूर नेण्‍याचा प्रयत्न करणे यांमध्‍ये गुंतलेल्‍या लोकांना खुले आव्‍हान देत संत रामबालक दास महात्‍यागी म्‍हणाले की, छत्तीसगडमध्‍ये आता काळ पालटला आहे. जो हिंदूंना विरोध करील तो चिरडला जाईल.

३. या कार्यक्रमाला विश्‍व हिंदु परिषदेचे कार्याध्‍यक्ष चंद्रशेखर वर्मा आणि लोकसभा खासदार भोज रामनाग हेही उपस्‍थित होते.