नवी देहली – छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा येथील जंगलात ४ ऑक्टोबरच्या दुपारी माओवाद्यांबरोबर उडालेल्या चकमकीत सुरक्षा यंत्रणांना ३६ माओवाद्यांना ठार करण्यात यश आले. ठार झालेल्यांच्या संख्येत वाढही होऊ शकते.
Major Anti-Naxal Operation in #Chhattisgarh
More than 30 Maoists killed in an Encounter with security forces! – The death toll likely to rise further.
📍Dantewada, Chhattisgarh
The joint operation was conducted by the District Reserve Guard and Special Task Force after… pic.twitter.com/VqKptAm8lo
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 4, 2024
जिल्हा राखीव दल आणि विशेष कृती दल यांनी ही संयुक्त कारवाई केली. या वेळी ‘एके’ प्रकारासहित अनेक रायफली, तसेच अन्य शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली. गुप्तचर यंत्रणांकडून माओवाद्यांच्या कारवायांविषयी माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.