मुंबई : तुम्हाला विजय मिळतो. तुम्हाला अधिक जागा मिळतात, तेव्हा ‘इ.व्ही.एम्.’ यंत्र चांगले असते. पराभव होतो, तेव्हा ‘इ.व्ही.एम्.’ यंत्र खराब असते. सर्वोच्च न्यायालयापासून ते निवडणूक आयोगापर्यंत त्यांच्या बाजूने निकाल लागला, तर ‘इ.व्ही.एम्.’ यंत्रणा चांगली. विरोधात निकाल गेला, तर न्यायालयावरही आरोप केले जात आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ डिसेंबर या दिवशी विरोधकांवर केली.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधीही पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. जेव्हा जिंकतो तेव्हा मतपत्रिकेची कुणी मागणी करत नाही, हा दुटप्पीपणा आहे.