उद्धव ठाकरे यांचे पदाधिकार्यांना आवाहन !
मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ३ डिसेंबर या दिवशी पक्षाच्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हिंदुत्वाच्या सूत्रावर लढवण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना केले.
‘आम्ही हिंदुत्व सोडले’, असा अपप्रचार विरोधकांनी केला.‘ मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढवू. यासाठी कामाला लागा’, असे आवाहन या वेळी उद्धव ठाकरे यांनी केली. निवडणुकीच्या चाचपणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून १८ निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.