Uddhav Thackeray Accuses Government : सरकारने सहस्रो एकर भूमी उद्योगपती अदानी यांना दिली !

महाविकास आघाडीचे सावंतवाडी, कुडाळ-मालवण आणि कणकवली मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सावंतवाडी, मालवण आणि कणकवली येथे जाहीर सभा झाल्या.

निवडणूक विशेष

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची सलग दुसर्‍या दिवशीही पडताळणी करण्यात आली. या वेळचा व्हिडिओ त्यांनी पुन्हा एकदा प्रसारित केला.

निवडणूक विशेष

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची झाडाझडती घेण्यात आली.

आमचे सरकार आल्यावर पुढची ५ वर्षे जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू ! – उद्धव ठाकरे

राज्यातील मुलींना राज्य सरकार विनामूल्य उच्चशिक्षण देणार आहे. त्याही पुढे जाऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही राज्यातील मुलांनाही विनामूल्य शिक्षण देऊ; कारण दोघेही तितकेच महत्त्वाचे आहेत..

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पूर्व विदर्भात ठाकरे गटाला एकही जागा नाही ! ; बोरीवली पूर्व येथे शिवसेना आणि ठाकरे गट यांत बाचाबाची …

पूर्व विदर्भात ठाकरे गटाला केवळ एकच रामटेकची जागा मिळाली आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी मोठी खेळी खेळल्याची चर्चा आहे. गोंदियामध्ये एकही जागा मिळालेली नाही.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : फडणवीस यांच्याशी वैयक्तिक वैर नाही ! – खासदार संजय राऊत; वैयक्तिक शत्रुत्वात उद्धव यांचे नाव पहिले – आमदार नितेश राणे…

देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैयक्तिक वैर नाही. आमचे केवळ राजकीय वैर आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.

शिवसेना उद्धव ठाकरे गटातून ६५ उमेदवार घोषित !

शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या ६५ उमेदवारांची पहिली सूची घोषित केली आहे. यात नवे आणि जुने उमेदवार आहेत. काँग्रेसच्या काही मतदारसंघांमध्येही उद्धव ठाकरेंच्या पक्षाने उमेदवार दिले आहेत.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पाळीव कुत्र्याची हत्या करणारा कह्यात ! ; कोंबड्यांच्या विष्ठेमुळे माशा वाढून विद्यार्थी आजारी !

पुणे येथे तरुणाने स्वतःच्या पाळीव कुत्र्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. या प्रकरणी त्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला कह्यात घेण्यात आले आहे. तरुणाने कुत्र्याला फासावर लटकावून त्याला जिवे मारले.

‘वन्दे मातरम्’ला विरोध आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यालयावर आक्रमण करणारे इद्रिस नायकवडी यांची आमदारकी रहित करा !

काँग्रेसचे माजी महापौर इद्रिस इलियास नायकवडी यांनी त्यांच्या समर्थकांच्या साहाय्याने ३ नोव्हेंबर २००५ या दिवशी मिरज येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्यालय आणि कोरे रुग्णालय यांवर आक्रमण करून तोडफोड केली होती.

पेण येथे शांतता समितीचे सदस्‍य आणि ठाकरे गटाचा नेता शादाब भाई याच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

शांतता समितीत असे सदस्‍य असणे लज्‍जास्‍पद ! समितीने अशा सदस्‍यांना काढून टाकायला हवे !