निवडणुकांच्या निकालावरून मान्यवरांच्या प्रतिक्रिया !
राज्यातील हिंदुत्वाचे काम लोकांना आवडले. माझ्या मतदारसंघात माझ्या विरुद्ध जिहाद्यांच्या माध्यमातून विषारी प्रचार करण्यात आला; पण माझ्या मतदारसंघातील हिंदु समाज कडवटपणे माझ्यासोबत राहिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, ‘‘हे धर्मयुद्ध आहे.’’ ही ‘भगवा विरुद्ध फतवा’ अशी लढाई होती. आता भगवाधार्यांचे राज्य आले. आता कानाकोपर्यात ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) नाही, तर ‘जय श्रीराम’ ऐकायला मिळणार !
निकालात गडबड आहे ! – संजय राऊत, खासदार, ठाकरे गट
आजचा निकाल हा जनतेचा कौल नाही. निकालात मोठी गडबड आहे. यामागे मोठे कारस्थान आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला. हा निकाल १०० टक्के लावून घेतलेला निकाल आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कर्तृत्वाचा परिणाम ! – राजू वाघमारे, शिवसेना
महिला मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्तृत्वाचा महायुतीच्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम झाला.
जनतेचा मोठा आशीर्वाद मिळाला ! – प्रवीण दरेकर, भाजप नेते
आम्हाला विजयाची निश्चिती होतीच; पण महाराष्ट्राची जनता इतका मोठा आशीर्वाद देईल, असे वाटले नव्हते. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी आहे.
एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांच्या विचारांची मते मिळाली ! – विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस, भाजप
भाजप-शिवसेनेची नैसर्गिक युती तोडल्याचा राग जनतेच्या मनात होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांच्या विचारांची मते मिळाली.
माझा मुलगा मुख्यमंत्री होणार ! – सरिता फडणवीस (उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातील भाजप आणि महायुतीच्या विजयाचे शिल्पकार मानले जात आहेत. माझा मुलगा मुख्यमंत्री व्हावा, ही राज्यातील जनतेची इच्छा आहे.
हिंदुत्व सोडून ‘असंगाशी संग’ अंगलट आला ! – चित्रा वाघ, नेत्या, भाजप
उद्धव ठाकरे यांनी आता तरी शहाणे व्हावे. असंगाशी संग त्यांच्या अंगलट आले. हिंदुत्व सोडून त्यांनी संजय राऊत यांच्या नादी लागणे, त्यांना केवढ्याला पडले !
उद्धव ठाकरे आमच्यासोबत आल्यास स्वागत ! – चंद्रकांत पाटील, भाजप नेते
उद्धव ठाकरे आमच्यासोबत आल्यास त्यांचे स्वागत आहे; पण अपक्षांची साथही मिळाल्यास महायुतीकडून त्यांना आमंत्रण दिले जाण्याची शक्यता नाही. त्यांनी स्वत: पुढाकार घेतल्यास भाजपचे वरिष्ठ नेते यावर विचार करतील.
उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या गर्वाचा पराभव ! – किरीट सोमय्या, भाजप
हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या गर्वाचा पराभव आहे. महाराष्ट्राने ‘व्होट जिहाद’ला कशा पद्धतीने रोखले जाऊ शकते, हे दाखवून दिले.
महाराष्ट्राने ‘गुलाबी’ रंग निवडला ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी संपूर्ण निवडणुकीत प्रचाराची विशेष रणनीती आखली होती. त्यांनी संपूर्ण प्रचारात गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले होते. त्यामुळे अजित पवार यांनी ट्वीटद्वारे ‘महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला आहे’, अशी प्रतिक्रिया दिली.
बारामतीची जनता हुशार ! – सौ. सुनेत्रा पवार (उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी)
राष्ट्रवादी पक्ष कुणाचा आहे, हे आता जवळपास सिद्ध झाले आहे. अजित पवार यांचे काम पाहून जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली. बारामतीची जनता हुशार आहे.
संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ ! – नारायण राणे, खासदार, भाजप
संजय राऊत यांच्याविषयी न बोललेले बरे. उद्धव ठाकरे यांची अशी अवस्था केवळ संजय राऊत यांच्यामुळेच झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्यांनी टीका केली, त्यांना त्यांची किंमत समजली आहे.
माझा विजय निश्चित झाला ! – संजय शिरसाट, शिवसेना
यंदाच्या निवडणुकीत प्रत्येकाने मला वेगवेगळ्या प्रकारे अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला. माझ्या विरोधात खोटे कथानक पसरवण्याचा प्रयत्न केला; पण जनतेने मला कौल दिला. माझा विजय निश्चित झाला.
राहुल गांधींचा खोटेपणा विधानसभेत चालला नाही ! – सौ. नवनीत राणा, माजी खासदार, भाजप
आमच्या श्रीरामाचे बाण या जिल्ह्यात माझ्या मतदारांनी चालवून दाखवले. राहुल गांधींचा खोटारडेपणा लोकसभेत चालला; पण विधानसभेत चालला नाही.
महायुतीच्या यशात ५ योजनांचा मोठा वाटा ! – डॉ. नीलम गोर्हे, कॅबिनेट मंत्री, शिवसेना
जे प्रश्न समोर दिसले आणि त्यामध्ये तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता होती, ते सरकारने घेतले. महायुतीच्या या यशात एकनाथ शिंदे सरकारने आणलेल्या ५ योजनांचा मोठा वाटा आहे.