अपघातग्रस्ताच्या साहाय्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाने सांगितलेल्या उपाययोजना !

सर्व रुग्णालयांमध्ये हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेत ‘आम्ही साहाय्यक व्यक्तीला अडवून ठेवणार नाही, तसेच त्यांच्याकडून पैसे घेणार नाही’, असा बोर्ड रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.

गौतम नवलखा यांना घरात नजरकैदेत ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश !

आरोग्याच्या कारणास्तव कारागृहाऐवजी नवी मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्याची नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली होती.

भटकी कुत्री सांभाळतांना इतरांना त्रास होऊ नये ! – सर्वोच्च न्यायालय

मुळात भटक्या कुत्र्यांमुळे सर्वांनाच त्रास होतो, हे स्पष्ट आहे. देशात प्रतिदिन पाळीव असो कि भटकी कुत्री, ती अनेक लोकांना चावे घेत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाय काढण्याची आवश्यकता आहे !

शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन संमत !

शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी सध्या तळोजा कारागृहात बंदिस्त असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने १८ नोव्हेंबर या दिवशी जामीन संमत केला. एप्रिल २०२० पासून ते अटकेत होते.

आंदोलन, संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा हिंदु धर्माभिमान्यांचा निर्धार !

भारत आणि नेपाळ अनादि काळापासून हिंदु राष्ट्र होते; परंतु धर्मनिरपेक्षतेच्या दुष्टचक्रात फसल्यामुळे येथील हिंदूंचे दमन होत आहे. अशा परिस्थितीत परिवर्तन आणण्यासाठी येथे परत घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र स्थापन करणे अनिवार्य आहे.

बलपूर्वक धर्मांतर देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर गोष्ट !

धर्माचे स्वातंत्र्य असू शकते; मात्र बलपूर्वक धर्मांतराचे स्वातंत्र्य असू शकत नाही. राज्यांकडून या संदर्भात कायदे केले जाऊ शकतात; मात्र केंद्र सरकारने याविषयी काय पावले उचलली आहेत, ते त्याने सांगावे. अन्यथा हे पुष्कळ कठीण होईल.

पालघर येथील साधूंच्या हत्याकांडाविषयी सर्वाेच्च न्यायालयात उद्या सुनावणी !

पालघर जिल्ह्यातील गडचिंचाळे गावात एप्रिल २०२० मध्ये जमावाने आक्रमण करून २ साधू आणि त्यांच्या गाडीचा चालक यांची हत्या केली होती. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयात १५ नोव्हेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे.

अफझलखानाच्या कबरीच्या आजूबाजूच्या वास्तू पाडल्याच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने अहवाल मागवला !

अफझलखानाच्या कबरीच्या आजूबाजूच्या वास्तू पाडल्याच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने सातारा जिल्हाधिकारी आणि उपवनसंरक्षक यांच्याकडून अहवाल मागवला आहे.

ज्ञानवापीतील शिवलिंगाचे संरक्षण करण्याचा आदेश कायम !

वाराणसी येथील ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाला  संरक्षण देण्याचा पूर्वी दिलेला आदेश सर्वाेच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. पुढील आदेशापर्यंत संरक्षण देण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व ६ दोषींची सुटका !

भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी कारागृहात असलेल्या सर्व ६ दोषींना मुक्त करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. या दोषींवर जर अन्य कुठलाही खटला नसेल, तर त्यांना मुक्त करण्यात यावे, असे न्यायालयाने आदेशामध्ये म्हटले आहे.