अफझलखानाच्या कबरीच्या आजूबाजूच्या वास्तू पाडल्याच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने अहवाल मागवला !

देहली – अफझलखानाच्या कबरीच्या आजूबाजूच्या वास्तू पाडल्याच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने सातारा जिल्हाधिकारी आणि उपवनसंरक्षक यांच्याकडून अहवाल मागवला आहे. महाराष्ट्र शासनाकडून १० नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील प्रतापगडावरील अफझलखानाच्या थडग्याभोवती निर्माण झालेले अवैध बांधकाम पाडण्याची कारवाई चालू करण्यात आली आहे. याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. त्याविषयी सर्वोेच्च न्यायालयाने ११ नोव्हेंबरला वरील आदेश पारीत केला आहे.