गौतम नवलखा यांना घरात नजरकैदेत ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश !

 

गौतम नवलखा

मुंबई – कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना कारागृहातून नवी मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १९ नोव्हेंबर या दिवशी ही कार्यवाही करण्यात आली.

आरोग्याच्या कारणास्तव कारागृहाऐवजी नवी मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्याची नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली होती. त्यानुसार त्यांची ही मागणी मान्य करत नजरकैदेत असेपर्यंत त्यांच्यावर सीसीटीव्हीद्वारे पाळत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, तसेच त्यांच्या भ्रमणभाष वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सामाजिक संकेतस्थळाचा वापरही त्यांना करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.