ऑक्सफर्डचा हिंदुद्वेष !

अभिव्यक्तीस्वातंत्र्याची झूल पांघरणार्‍या विद्यापिठांची तत्त्वे किती पोकळ आणि बेगडी असतात, हे जगासमोर उघड व्हायला हवे. भारतात ऑक्सफर्डच्या तोडीची विद्यापिठे निर्माण झाली, तर विदेशात शिक्षणासाठी जाणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांचा ओघ अल्प होईल आणि त्या वेळीच खर्‍या अर्थाने ऑक्सफर्डसारखी विद्यापिठे ताळ्यावर येतील !

पुणे विद्यापिठाचा परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय ; अभाविपच्या तीव्र आंदोलनानंतर मागणीला यश

असे आंदोलन का करावे लागते ? विद्यापीठ प्रशासन स्वतःहून विद्यार्थ्यांच्या हितार्थ निर्णय का घेत नाही ?

इतिहास रचणारे भारतीय !

रश्मी सामंत नावाच्या ऑक्सफर्ड येथे शिकणार्‍या भारतीय विद्यार्थिनीने एक अनोखा इतिहास रचला आहे. ती ‘ऑक्सफर्ड स्टुडंट युनियन’च्या अध्यक्ष म्हणून निवडून आली आहे. अशी निवड होणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. तिच्या चमूत अन्य काही भारतीय मुलेही निवडून आली आहेत.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने युवक सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम पार पडले 

या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रतिमा पूजन, विविध कार्यक्रम, उपक्रम, व्याख्याने, स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. याचसमवेत सांगली, विश्रामबाग आणि मिरज या नगरातील मुख्य चौकामध्ये पथनाट्य सादर करण्यात आली.

महाविद्यालये चालू करण्याच्या मागणीसाठी अ.भा.वि.प.च्या कार्यकर्त्यांचे आंदोलन  

राज्यातील महाविद्यालये चालू करावीत, यासाठी अ.भा.वि.प.च्या कार्यकर्त्यांनी २१ जानेवारी या दिवशी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्ग भरवून आंदोलन केले. शासनाने महाविद्यालये लवकर चालू करावीत, अशी मागणी अ.भा.वि.प.चे पुणे महानगरमंत्री शुभम भूतकर यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

‘‘ऑफलाईन’ परीक्षेला बसा अन्यथा घरी चला ! ’’

‘ऑफलाईन’ परीक्षेला विरोध करणार्‍या ‘एन्.एस्.यू.आय.’च्या विद्यार्थी सदस्यांना जी.व्ही.एम्. महाविद्यालयाच्या प्राचार्यांची चेतावणी !

साम्यावाद्यांची हिंसाचारी वृत्ती जाणा !

भारतात ‘अ‍ॅपल’चे आयफोन बनवणारे आस्थापन ‘विन्ट्रॉन कॉर्पोरेशन’च्या कारखान्यावर झालेल्या तोडफोडीच्या प्रकरणी साम्यवादी विद्यार्थ्यांची संघटना ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’चा स्थानिक अध्यक्ष कॉम्रेड श्रीकांत याला अटक करण्यात आली आहे.

जे.एन्.यू.ची माजी विद्यार्थिनी शेहला रशीद हिचा देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग ! – शेहला रशीदच्या वडिलांचा आरोप

पोलिसांनी सखोल अन्वेषण करावे; कारण जेएनयूमधील साम्यवादी विचारांच्या विद्यार्थ्यांना आणि नेत्यांपैकी काही जणांना अशाच प्रकरणांत अटक करण्यात आलेली आहे. स्वतः वडीलच मुलीविषयी असा आरोप करत असतील, तर तो अधिकच गंभीर !

मणिपूर शासनाच्या अभ्यासक्रमात संस्कृतचा समावेश करण्यास विद्यार्थी संघटनेचा विरोध

देवभाषा संस्कृतचे महत्त्व न जाणताच त्याला विरोध करणार्‍या विद्यार्थी संघटनेचा हिंदुद्वेष ! भारतापासून स्वत:ला वेगळे समजणार्‍या किंबहुना आपल्या निवेदनातून लोकांना तसा संदेश देणार्‍या या संघटनेवर बंदीच घालण्याची आवश्यकता आहे !