नियमांचे पालन करण्याऐवजी त्यांचा अशा प्रकारे विरोध करणार्या विद्यार्थ्यांवर काय संस्कार झाले आहेत, हे लक्षात येते ! असे विद्यार्थी कधीतरी देशाचे आदर्श नागरिक होऊ शकतील का ?
सासाराम (बिहार) – बिहारमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे येथील कोचिंग सेंटर बंद केल्याने विद्यार्थ्यांनी त्याची तोडफोड आणि जाळपोळ केली. तसेच मोठ्या प्रमाणात दगडफेक केली.
बिहार में कोरोना के बढ़ते मामलों के बीच कोचिंग सेंटर बंद कराए जाने से स्टूडेंज नाराज हैं #Biharhttps://t.co/Ccq3fhERqQ
— AajTak (@aajtak) April 5, 2021
पोलिसांनी ९ विद्यार्थ्यांना या प्रकरणी अटक केली आहे. विद्यार्थ्यांना रोखतांना ३ पोलीसही घायाळ झाले. तसेच काही पत्रकारही दगडफेकीत घायाळ झाले. विद्यार्थ्यांवर नियंत्रण मिळवतांना अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, अन्य सर्व गोष्टी चालू आहेत आणि केवळ शिक्षण संस्थांनाच बंद करण्यात येत आहे.