महाविद्यालये चालू करण्याच्या मागणीसाठी अ.भा.वि.प.च्या कार्यकर्त्यांचे आंदोलन  

पुणे – राज्यातील महाविद्यालये चालू करावीत, यासाठी अ.भा.वि.प.च्या कार्यकर्त्यांनी २१ जानेवारी या दिवशी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्ग भरवून आंदोलन केले. वर्ष संपत आले, तरी महाविद्यालये चालू नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांची हानी होत आहे, ही चिंतेची गोष्ट आहे. हे सरकार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे. तरी शासनाने महाविद्यालये लवकर चालू करावीत, अशी मागणी अ.भा.वि.प.चे पुणे महानगरमंत्री शुभम भूतकर यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.