कर्नाटकातील सरकारी शाळांमध्ये योग आणि ध्यान शिकवण्याच्या निर्णयाकडे काँग्रेस सरकारचे दुर्लक्ष ! – श्री. मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती

काँग्रेसचा हिंदुद्वेष ! योग आणि ध्यान हिंदु धर्मातील असल्यानेच आणि मागील भाजप सरकारने ते शिकवण्याचा निर्णय घेतला असल्यानेच काँग्रेस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. काँग्रेसला मतदान करणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

कर्नाटक सरकारकडून कळसा-भंडुरा प्रकल्पासाठी १ सहस्र कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद

म्हादई पाणी तंटा लवादाने कळसा आणि भंडुरा नाला पेयजल प्रकल्पासाठी पाणी वापरण्यास यापूर्वीच अनुमती दिलेली आहे. पर्यावरण मंत्रालयाची आवश्यक अनुज्ञप्ती मिळाल्यानंतर कळसा-भंडुरा प्रकल्पाचे काम चालू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार !

(म्हणे) ‘मनुवाद्यांना भुईसपाट केले पाहिजे !’ – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

शिखांच्या विरोधात दंगली घडवणारे, धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीच्या काळात हिंदूंना वार्‍यावर सोडणारे आणि विविध घोटाळे करणार्‍या काँग्रेसवाल्यांना भुईसपाट करण्याची कुणी मागणी केल्यास चूक ते काय ?

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून पोलीस अधीक्षकांचा  अवमान !

बैठक संपल्यावर मुख्यमंत्र्यांच्या आधी खुर्चीवरून उठलेल्या पोलीस अधीक्षकांवर ओरडून त्यांना पुन्हा बसण्यास सांगितले !

कर्नाटकातील ३४ मंत्र्यांपैकी १६ मंत्र्याविरुद्ध फौजदारी प्रकरणे नोंद !

देशातील बहुतेक राजकारण्यांविरुद्ध विविध प्रकारची गुन्हे नोंद आहेत. काही जण कारागृहातही आहेत. तेथूनही ते निवडणूक लढवत आहेत. ही स्थिती लोकशाहीला मारकच आहे !

सिद्धरामय्या यांच्या विरोधात लिखाण करणारा सरकारी शाळेतील शिक्षक निलंबित !

व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून राजकारण्यांच्या विरोधात कुणीही काहीही बोललेले चालत नाही; पण हिंदूंच्या देवतांच्या विरोधात बोलून देवतांचा अवमान केलेला मात्र चालतो ! हे चित्र पालटायला हवे !

(म्हणे) ‘आतंकवादी आक्रमणात भाजपचा एकही नेता अद्याप मेलेला नाही !’-मुख्यमंत्री सिद्धरामय्या

देहलीच्या बाटला हाऊसमध्ये जिहादी आतंकवाद्यांना पोलिसांनी ठार मारल्यावर सोनिया गांधी रडल्या होत्या, यातून आतंकवाद्यांविषयी कुणाला कळवळा आहे ?, हे जनतेला ठाऊक आहे !

हिंदुद्वेषाची पुनरावृत्ती ?

कर्नाटकमध्ये हिंदुद्वेषी आणि हिंसक इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !

सिद्धरामय्या होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री !

चार दिवसांच्या मनधरणीनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला असून सिद्धरामय्या हे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. डी.के. शिवकुमार यांनी सध्या तरी उपमुख्यमंत्री पदावर समाधान व्यक्त केले आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कर्नाटकातील काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी श्रीराम मंदिरात जाऊन केली पूजा !

श्रीरामाचे अस्तित्व नाकारणार्‍या काँग्रेसींना निवडणुकीच्या वेळी मात्र भगवान श्रीराम आठवतो, हे लक्षात घ्या ! अशा राजकीय हिंदूंना हिंदू ओळखून असून त्यांना त्यांची जागा दाखवतील यात शंका नाही !