Siddaramaiah : म. गांधी यांच्यासारख्या श्रेष्ठ हिंदूची हत्या करणारे हिंदु धर्माविषयी बोलतात ! – सिद्धरामय्या

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची संघ आणि भाजप यांच्यावर टीका !

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बेंगळुरू (कर्नाटक) – आमच्यावर हिंदूविरोधी म्हणून आरोप करतात; परंतु म. गांधी यांच्यासारखा श्रेष्ठ हिंदु कुणीच नाही. अशा श्रेष्ठ हिंदूची हत्या करणारे हिंदु धर्माविषयी बोलतात, अशी टीका कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म. गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की,

१. म. गांधी यांची धर्मांध गोडसे याने गोळ्या घालून हत्या केली. आज तोच गोडसे रा.स्व. संघवाल्यांचा आदर्श आहे.

२. म. गांधी यांनी सत्य आणि अहिंसा सांगितली. (सत्य आणि अहिंसा ही व्यष्टी साधनेच्या अंतर्गत येते, हेही ठाऊक नसल्याने शत्रूसमोर देशाचा अन् हिंदूंचा आत्मघात करणारे म. गांधी ! – संपादक) देशाला स्वातंत्र्य मिळालेल्या दिवशीच ते बंगालमध्ये हिंदु आणि मुसलमान यांच्यात सौहार्द निर्माण करण्याचे काम करत होते. (सौहार्द नाही, तर धर्मांधांच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देऊ लागल्याने हिंदूंना शस्त्रे खाली ठेवण्यासाठी दबाव निर्माण करण्याचे काम करत होते. एक गालावर कुणी मारले, तर दुसरे गाल पुढे करण्यास सांगत होते ! – संपादक)  गांधी हे मानवता आणि भ्रातृत्व यांतत विश्‍वास ठेवणारे होते. (हिंदूंना फसवून मानवता आणि भ्रातृत्व यांचे पालन करून जगात स्वतःला महान बनवणारे म. गांधी ! – संपादक) म. गांधी यांच्या आदर्श तत्त्वांचे पालन करणे, हा त्यांना दिलेला सन्मान आहे. (हा हिंदूंचा घात आहे ! – संपादक)

३. भाजप रामाचे नाव राजकारणासाठी वापरत आहे. म. गांधी यांचे शेवटचे शब्द ‘हे राम’ असे होते. अशा व्यक्तीला मारणारे आता रामाचा जप करत आहेत. (म. गांधी यांच्या सोयीच्या मतांचा वापर करणार्‍या काँग्रेसवाल्यांनी याच श्रीरामाला काल्पनिक ठरवले आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

भारताच्या फाळणीला मान्यता देणारे, फाळणीच्या वेळी लक्षावधी हिंदूंची हत्या होत असतांना त्यांच्या रक्षणासाठी निष्क्रीय रहाणारे, पाकिस्तानला ५५ कोटी रुपये (आताचे १ लाख २५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक रुपये) देण्यास सांगणारे आदी अनेक हिंदुद्रोही निर्णय घेणारे म. गांधी कधीतरी श्रेष्ठ हिंदू असू शकतील का ?