कर्नाटक सरकारकडून ‘राष्ट्रीय बसव पुरस्कार’ माओवादी आणि नक्षलवादी समर्थकास घोषित !

सोलापूर शहरात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निर्णयाचा जोरदार विरोध ! 

निषेध करण्यासाठी उपस्थित बसवेश्‍वर प्रेमी

सोलापूर, १ फेब्रुवारी (वार्ता.) – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या काँग्रेस सरकारने राज्याचा अत्यंत प्रतिष्ठित असलेला ‘राष्ट्रीय बसव पुरस्कार’ हा माओवादी- नक्षलवादी समर्थक आनंद तेलतुंबडे याला घोषित केला आहे. वर्ष २०१८ मध्ये महाराष्ट्रातील एल्गार परिषदेनंतर राज्यभर उसळलेल्या हिंसाचारात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्.आय.ए.’कडून) आरोपी म्हणून तेलतुंबडे याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर एक वर्षानंतर तेलतुंबडे याला जमिनावर सोडण्यात आले आहे. त्यामुळे येथील वीरशैव लिंगायत समाज आणि बसवेश्‍वर प्रेमी यांच्याकडून कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचा जोरदार विरोध करण्यात आला.

सौजन्य एबीपी माझा 

या वेळी वीरशैव लिंगायत समाजाचे श्री. चन्नवीर चिट्टे म्हणाले की, आरोपी न्यायालयीन प्रक्रियेत असतांना राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा महात्मा बसवेश्‍वर यांच्या नावे असणारा पुरस्कार आरोपीस देणे, हा त्यांच्या विचारांची मानहानी करण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांचा आम्ही धिक्कार करतो. या प्रसंगी सर्वश्री राहुल पावले, सागर अतनुरे, अक्षय अंजीखाने, चिदानंद मुस्तारे, परमेश्‍वर ख्याडे, सुशांत पाटील, जगदीश पाटील, राजू बबलादी, विनायक शरनार्थी, राजू दिड्डी, सचिन कुलकर्णी, श्रीशैल हिरेमठ आदी उपस्थित होते.