INC Karnataka Anti-National Remark : पाकिस्तान काँग्रेससाठी शत्रूराष्ट्र नसल्याचे काँग्रेसच्या नेत्याचे राष्ट्रघातकी विधान !

काँग्रेसचे नेते बी.के. हरिप्रसाद

बेंगळुरू – राज्यसभा निवडणुकीत कर्नाटकातील काँग्रेसचे नेते नसीर हुसेन विजयी झाले. त्यांच्या विजयाचा आनंद साजरा केला जात असतांना विधानसभेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या, असा खळबळजनक आरोप भाजपने केला होता. त्याला उत्तर देतांना काँग्रेसचे नेते बी.के. हरिप्रसाद यांनी विधान परिषदेमध्ये म्हणाले, ‘‘भाजपावाल्यांसाठी पाकिस्तान एक शत्रूराष्ट्र  आहे; मात्र आमच्यासाठी पाकिस्तान शत्रूराष्ट्र नाही. तो केवळ एक शेजारील देश आहे.’’

या विधानावरून कर्नाटकमधील भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे. ‘पाकिस्तानने भारताच्या विरोधात ४ युद्धे लढली आहेत. ‘पाकिस्तानविषयी काँग्रेसचे काय मत आहे ?’, हे हरिप्रसाद यांनी सभागृहात स्पष्ट केले आहे. त्यांच्य विधानावरून नेहरू आणि महंमद अली जिना यांच्यातील घनिष्ठ संबंध काँग्रेसच्या वर्तमान पिढीनेही जपल्याचे  दाखवून दिले आहे’, असे भाजपने म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

अशा राष्ट्रघातकी पक्षाने भारतावर सर्वाधिक काळ राज्य केले, हे भारतासाठी लज्जास्पद ! अशा पक्षाचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी राष्ट्रप्रेमींनी कंबर कसणे आवश्यक !