(म्हणे) ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणारे काही जण राक्षस ! – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशिद अल्वी

इस्लामचे नाव घेऊन, महंमद पैगंबर यांच्या नावाने आतंकवादी कारवाया करत निरपराध्यांना ठार मारणारे कोण आहेत, हेही राशिद अल्वी यांनी सांगितले पाहिजे !

फतेहाबाद (हरियाणा) येथील ‘सेंट मेरी पब्लिक स्कूल’ आणि ‘डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल’ यांच्या रामलीलेच्या कार्यक्रमांत श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांचे अश्‍लाघ्य विडंबन

हिंदुबहूल भारतात हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे वारंवार अशलाघ्य विडंबन करूनही सरकार, पोलीस आणि प्रशासन त्याची साधी दखलही घेत नाहीत. हे हिंदूंना लज्जास्पद !

धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वेच्या ‘श्री रामायण यात्रा’ विशेष रेल्वे गाडीला प्रारंभ !

आय.आर्.सी.टी.सी.ने (‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ने) धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘श्री रामायण यात्रा’ रेल्वे गाडीची योजना आखली आहे. ही यात्रा ७ नोव्हेंबरपासून चालू करण्यात आली आहे.

(म्हणे) ‘प्रभु श्रीराम हे केवळ भाजप आणि संघ यांचेच नाहीत, तर संपूर्ण जगाचे आहेत !’ – फारूक अब्दुल्ला, नेते, नॅशनल कॉन्फरन्स

जर असे आहे, तर भारतातील मुसलमानांनी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मुक्त करण्याला विरोध का केला ? भगवान श्रीरामाप्रमाणेच भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शिव हेही सार्‍या जगाचे आहेत, तर त्यांच्या काशी आणि मथुरा येथील मंदिरांची जागा मुसलमान हिंदूंना का सोपवत नाहीत ?

मंगलम् कापूर’च्या विज्ञापनामध्ये प्रभु श्रीरामाचा अवमान !

अशा प्रकारे अन्य धर्मियांच्या देवतांचा वापर करून विज्ञापन बनवण्याचे धारिष्ट्य मंगलम् कापराची निर्मिती करणार्‍या आस्थापनाने दाखवले असते का ? हिंदूंमध्ये धर्माभिमान नसल्यामुळेच अशा प्रकारे विविध माध्यमांतून हिंदूंच्या देवतांचा अवमान केला जातो !

मध्यप्रदेशात कला शाखेच्या अभ्यासक्रमामध्ये रामचरितमानस, महाभारत, योग, ध्यान आदी शिकवले जाणार !

मध्यप्रदेश शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! भाजपशासित प्रत्येक राज्याने आणि केंद्र सरकारनेही असा निर्णय घेतला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

सनातनच्‍या रामनाथी आश्रमात हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेला गती देण्‍यासाठी उभारलेल्‍या धर्मध्‍वजातून पुष्‍कळ प्रमाणात चैतन्‍य प्रक्षेपित होणे

धर्मध्‍वजातून प्रक्षेपित होणार्‍या स्‍पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्‍यास करण्‍यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात ‘युनिव्‍हर्सल ऑरा स्‍कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्‍यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्‍यात्‍मशास्‍त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांशी प्रभु श्रीराम यांचा संबंध !

कझाकिस्तानमध्ये ज्या ठिकाणी बाण पडला, ते ठिकाण ‘किजिलकुम मरुभूमी’ या नावाने ओळखले जाते. ते जगातील १५ वे सर्वांत मोठे वाळवंट आहे.

स्वातंत्र्यवीर द्रष्टेच ! 

‘हिंदु राष्ट्रा’च्या निर्मितीसह स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचारधन अनुसरण्यासाठी देशात प्रयत्न व्हायला हवेत. ‘शुभस्य शीघ्रम्’या उक्तीप्रमाणे केंद्र सरकारने या दिशेने वाटचाल करावी, असे राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते !

‘रामयुग’ या ‘वेब सिरीज’मधून श्रीराम आणि सीता यांना आधुनिक दाखवण्याचा अश्‍लाघ्य प्रकार !

वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे सातत्याने विडंबन झाल्यामुळे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी आवाज उठवला. त्यामुळे सरकारने ‘वेब सिरीज’ बनवणार्‍यांसाठी नियमावली बनवली; मात्र त्यात कठोर शिक्षेची तरतूद नसल्यामुळे हिंदूंच्या देवतांचे विडंबन चालू आहे.