|
संभाल (उत्तरप्रदेश) – ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणारे सर्व जण मुनि असू शकत नाहीत. सध्या श्रीराम म्हणणारे काही लोक संत नाहीत, तर राक्षस आहेत, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशिद अल्वी यांनी येथे कल्की महोत्सवामध्ये केले. काँग्रेसचे नेते प्रमोद कृष्णन् यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये ते बोलत होते.
Rashid Alvi claims ‘Not all chanting Jai Shri Ram are saints’; BJP fumes at Congress https://t.co/HYQPODnKcg
— Republic (@republic) November 12, 2021
राशिद अल्वी यांनी त्यांच्या भाषणात रामायणातील एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले की, लंकेतील युद्धाच्या वेळी लक्ष्मणाला बाण लागल्यावर संजीवनी आणण्यासाठी हनुमान जात असतांना त्याचा मार्ग रोखण्यासाठी रावणाने एका राक्षसाला पाठवले. तो एका ठिकाणी बसून श्रीरामांचे गुणगान करत होता. ते पाहून हनुमान तेथे थांबला; मात्र त्याच्या लक्षात आले की, तो राक्षस आहे. तेव्हा त्याने त्या राक्षसाला ठार मारले. आताही काही राक्षस याचप्रमाणे भगवान श्रीरामाच्या नावाचा जप करत आहेत. (‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत लोकांच्या हत्या करणारे कोण आहेत ? हे राशिस अल्वी कधी सांगणार ? – संपादक) भगवान श्रीरामांचे नाव स्नान केल्याविनाच घेत आहेत. (हिंदु धर्मामध्ये देवाचे नाम घेण्यासाठी कोणतेही बंधन नाही. हिंदु धर्माचे ज्ञान नसतांना त्याविषयी तोंड आहे; म्हणून बोलणार्या राशिद अल्वी यांनी त्यांच्या धर्माविषयीच्या बुरसटलेल्या प्रथांविषयी लोकांना सांगावे, हे अधिक योग्य होईल ! – संपादक) त्यामुळे मी प्रार्थना करतो की, भगवान कल्की यांनी लवकरात लवकर अवतार घेऊन गुन्हेगारांना नष्ट करावे.