करवीरतालुका शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचे असेल, तर शिवसेनाच हवी ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आकांक्षा होती की, शिवसेना संपूर्ण देशात गेली पाहिजे. ही आकांक्षा पूर्ण करण्याची धडपड आपण हयात असलेल्या लोकांनी करायला हवी.

भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आष्टा नगरपालिकेसमोर शिवसेनेचे आंदोलन 

नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराची, ४ वर्षांत ३३ टन जंतूनाशक पावडर आणि अन्यत्र झालेल्या अशा २० लाख रुपये व्ययाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागण्यांसाठी नगरपालिकेच्या समोर शिवसेनेच्या वतीने १९ जानेवारी या दिवशी बुरखा फाडो आंदोलन करण्यात आले.

विनम्र अभिवादन !

• नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती
• हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती

भारताला हिंदु राष्ट्र संबोधण्यास प्रारंभ करा ! – हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे

‘तुम्हा हिंदूंची कुंभकर्णाला लाजवेल, अशी झोप असून ती उडाली नाही, तर झोपेतच तुमचा मुडदा पडेल. ब्रिटनमध्ये मार्गारेट थॅचरबाईंनी मुसलमानांचे लाड चालू दिले नाहीत. तसे शासन आपल्याकडे हवे !

मेट्रो कारशेडविषयी अधिकार्‍यांकडून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल ! – फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, कारशेड कांजूरमार्गला नेले, तर आरेपेक्षा तीनपट अधिक झाडे तोडावी लागतील. केवळ जागा पालटण्याच्या अट्टहासापोटी सहस्रो कोटींची हानी होईल.

सामान्य माणसाला दिलासा, तसेच सदस्य, अधिकारी-कर्मचारी यांना प्रेरणा ! – शरद पवार, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

जिल्हा परिषद प्रांगणामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने प्रदान केलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण २२ जानेवारीला करण्यात आले.

भूमीगत पाण्याच्या स्रोतांचा आढावा घ्या ! – आमदार वैभव नाईक

जिल्ह्यातील सर्व गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कशा प्रकारे करता येईल, याचे नियोजन करावे, अशी सूचना शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ‘जल जीवन मिशन’च्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत दिली.

बेळगाव महापालिकेसमोर भगवा फडकावण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले

या वेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमारही केला. पोलिसांनी रोखल्याने शिवसैनिकांनी सीमेवरच ठाण मांडले. जोपर्यंत भगवा फडकावणार नाही, तोपर्यंत मागे फिरणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करा !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी घालून दोषींवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने २० जानेवारीला येथील जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.