राज्यातील प्रमुख गड-दुर्ग इस्लामी अतिक्रमणाच्या विळख्यात !

सातारा येथील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या थडग्याजवळील अवैध बांधकाम १० नोव्हेंबर या दिवशी शासनाने पाडले; मात्र अशाच प्रकारचे अवैध बांधकाम राज्यातील विशाळगड, लोहगड, कुलाबा, दुर्गाडी, मलंगगड, माहीम, शिवडी आदी गडांवर विस्तारत आहे.

अफझलखानाचा कोथळा पुन्हा काढला !

शासनाच्या या कौतुकास्पद कृतीसाठी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांना दीर्घकाळ वाट पहावी लागली. असे असले, तरी त्यांना शासनाने चांगली बातमी दिलीच ! हिंदुत्वनिष्ठ शासनाचेही अभिनंदन ! आता हिंदुत्वनिष्ठांची गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त होण्यासाठीची प्रतीक्षा शासनाने संपवावी, ही जनतेची अपेक्षा !

‘हिंदु जनजागृती समिती’च्या द्विदशकपूर्तीनिमित्त जुन्नर (जिल्हा पुणे) येथील शिवनेरी गडाची सामूहिक स्वच्छता !

सर्व धर्मप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली, याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. सर्वजण अधूनमधून जोशपूर्ण घोषणा देऊन एकमेकांचा उत्साह वाढवत होते.

जिल्हाधिकार्‍यांनी विशाळगडावरील अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत !

जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानंतर पुरातत्व विभागाने संबंधितांना विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा दिल्या. या नोटिसांचा कालावधी वर्ष नोव्हेंबर २०२१ मध्ये संपल्यावर पुढे काहीच कारवाई झाली नाही. गेल्या ९ मासांपासून पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची कोल्हापूर विभागाची श्री दुर्गामाता दौड उत्साहात पार पडली !

दौडीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिक्शांवर गडकिल्ले संवर्धन आणि गडांवरील अतिक्रमण या संदर्भात जनजागृती करणारे फलक लावण्यात आले होते. ‘गडकिल्ले पर्यटनस्थळ आहेत कि ऐतिहासिक ठिकाण ?’, ‘पन्हाळागडाचे पावित्र्य राखणार कोण ?’, ‘विशाळगडमुक्ती संग्राम’, अशा लिखाणाचा समावेश होता.

छत्रपती शिवरायांना अभिवादनाव्यतिरिक्त अन्य विधींना रायगडावर अटकाव करावा !

प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या कबरीचा विस्तार, तसेच रायगड, विशालगड, लोहगड, कुलाबा आदी गडांवर धर्मांधांनी केलेले अवैध बांधकाम या विरोधातही संभाजी ब्रिगेडने आवाज उठवावा !

गड-दुर्ग यांचे जतन होण्यासाठी महामंडळ किंवा प्राधिकरण स्थापना करू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

गड-दुर्ग यांच्या संवर्धनासाठी मंत्रालयावर मोर्चा काढणार्‍या शिवप्रेमींना मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद !

१८ सप्टेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भव्य आंदोलन !

गडदुर्गांच्या दृष्टीने स्वतंत्र महामंडळ स्थापनेसाठी समस्त हिंदूंकडून आयोजन !

विशाळगडावरील अतिक्रमण न हटवल्यास मनसे पद्धतीने काढून टाकू ! – युवराज काटकर, मनसे जिल्हाउपाध्यक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुरातत्व विभागाच्या निषेधार्थ आंदोलन !

सिंहगडावरील नवीन १२ अतिक्रमणे काढली !

वन आणि पुरातत्व विभाग यांची संयुक्तपणे कारवाई