महाराष्ट्रात लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करावा ! – वारकर्‍यांची एकमुखाने मागणी

आळंदी येथील भव्य १६ वे वारकरी महाअधिवेशन

प्रतापगडाप्रमाणे लोहगडावरील अतिक्रमण हटवावे ! – शिवभक्तांची पुरातत्व विभागाकडे मागणी

लाखो रुपयांचे वेतन घेणारे पुरातत्व विभागाचे अधिकारी नेमके काय करतात ? असा भोंगळ कारभार असणार्‍या पुरातत्व विभागाकडून गड-दुर्गांचे जतन केले जाईल याची अपेक्षा काय ठेवणार ? कामचुकार अधिकार्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी !

राज्यातील ऐतिहासिक वास्तू आणि गड यांच्या संवर्धनासाठी निधी देण्यास शासन कटीबद्ध ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

राज्य अनेक ऐतिहासिक वास्तू आणि गड यांनी समृद्ध आहे. हा समृद्ध इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोचणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हा इतिहास जपला जात आहे.

वन विभागाकडून सिंहगडावरील १३८ अतिक्रमणे जमीनदोस्त !

एवढे अतिक्रमण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? यास उत्तरदायी असणार्‍यांवरही कठोर कारवाई करा !

विशाळगडास (जिल्हा कोल्हापूर) तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक विशाळगडास तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा घोषित करण्यात आला आहे.

प्रतापगडावर भावी पिढीला प्रेरणा देणारा शिवरायांचा इतिहास उभारणार ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री

वर्ष २०२४ मध्ये शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा इतिहास भावी पिढीला माहिती व्हावा, यासाठी प्रतापगडावर छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची माहिती देणारे देखावे उभारण्यात येतील. यासाठी ‘लेझर शो’चेही आयोजन करण्यात येईल, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

प्रतापगडाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व गडदुर्ग इस्लामी अतिक्रमणांपासून मुक्त करावेत ! – नितीन शिंदे, माजी आमदार आणि निमंत्रक, शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन

सरकारने अन्य गडदुर्गांवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून त्यांना इस्लामी अतिक्रमणापासून मुक्त करावे आणि सर्व गडदुर्गांना गतवैभव प्राप्त करून द्यावे.

राज्यातील प्रमुख गड-दुर्ग इस्लामी अतिक्रमणाच्या विळख्यात !

सातारा येथील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या थडग्याजवळील अवैध बांधकाम १० नोव्हेंबर या दिवशी शासनाने पाडले; मात्र अशाच प्रकारचे अवैध बांधकाम राज्यातील विशाळगड, लोहगड, कुलाबा, दुर्गाडी, मलंगगड, माहीम, शिवडी आदी गडांवर विस्तारत आहे.

अफझलखानाचा कोथळा पुन्हा काढला !

शासनाच्या या कौतुकास्पद कृतीसाठी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांना दीर्घकाळ वाट पहावी लागली. असे असले, तरी त्यांना शासनाने चांगली बातमी दिलीच ! हिंदुत्वनिष्ठ शासनाचेही अभिनंदन ! आता हिंदुत्वनिष्ठांची गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त होण्यासाठीची प्रतीक्षा शासनाने संपवावी, ही जनतेची अपेक्षा !

‘हिंदु जनजागृती समिती’च्या द्विदशकपूर्तीनिमित्त जुन्नर (जिल्हा पुणे) येथील शिवनेरी गडाची सामूहिक स्वच्छता !

सर्व धर्मप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली, याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. सर्वजण अधूनमधून जोशपूर्ण घोषणा देऊन एकमेकांचा उत्साह वाढवत होते.