सातारा पोलीस दलाच्‍या वतीने वैराटगडाची स्‍वच्‍छता !

सातारा, १० फेब्रुवारी (वार्ता.) – ‘आपले किल्ले आपले उत्तरदायित्‍व’ या अनुषंगाने सातारा पोलीस दलाच्‍या वतीने वैराटगड येथे गड भ्रमंती आणि स्‍वच्‍छता मोहीम राबवण्‍यात आली. या मोहिमेमध्‍ये वाई उपविभागातील पाचगणी, महाबळेश्‍वर, भुईज आणि मेढा या पोलीस ठाण्‍यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला, तसेच सातारा पोलीस दलाच्‍या वतीने या मोहिमेची वार्ता प्रसारित करण्‍यात आल्‍यामुळे मोहिमेमध्‍ये स्‍थानिक नागरिकांनीही सहभाग नोंदवला. वैराटगडाच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या श्री भवानीमाता मंदिरापासून चढाईला प्रारंभ करण्‍यात आला. वेगवेगळे गट सिद्ध करून नियोजनबद्ध स्‍वच्‍छता मोहीम राबवण्‍यात आली. या मोहिमेत १२ पोलीस अधिकारी, ७० पोलीस अंमलदार, ११५ हून अधिक नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.

संपादकीय भूमिका 

अशी स्‍वच्‍छता पोलीसदलाला का करावी  लागते ? पुरातत्‍व विभाग काय करतो ?