धाडसी पाऊल !

देशात ठाण मांडून बसलेल्या केवळ रोहिंग्यांच्याच नव्हे, तर अन्य घुसखोरांच्या विरोधातही धाडसी पावले उचलून राष्ट्रीय सुरक्षा बळकट करावी !

बंगालमधून रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर यांना हाकलून द्या ! – सर्वोच्च न्यायालयात याचिका

बंगाल राज्यातून रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर यांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या देशांत हाकलून देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

जम्मूमध्ये पकडण्यात आलेल्या रोहिंग्यांना म्यानमारमध्ये पाठवा ! – सर्वोच्च न्यायालय

सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सुनावणीच्या वेळी म्हटले की, भारत सरकार म्यानमार सरकारशी याविषयी चर्चा करत आहे. सरकारच्या अनुमतीनंतर या रोहिंग्यांना परत पाठवले जाईल.

भारत घुसखोरांची राजधानी नाही !  

भारत जगातील घुसखोरांची राजधानी नाही. तसे आम्ही होऊ देणार नाही. सरकार कायद्यानुसार आपले काम करत आहे, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नमूद केले.

भारत आणि म्यानमार यांच्यातील रोहिंग्या मुसलमानांविषयीचा मोठा भेद (फरक) कोणता ?

रोहिंग्या मुसलमानांविषयी म्यानमारचे धोरण राष्ट्रहिताला प्राधान्य देणारे आहे. फुटीरता आणि आतंकवाद मुळापासून निपटणे, हेच सरकारी धोरणांचे उद्दिष्ट आहे.

हिंदूंना सुरक्षितता आणि संरक्षककवच देण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल ! – मंगलप्रभात लोढा, आमदार

मुसलमानांच्या सततच्या त्रासामुळे मालवणी (मुंबई) येथील हिंदूंची संख्या अल्प झाली ! महाराष्ट्रातील मौलवी, फादर यांच्याविरुद्ध बोलण्याची कुणाची हिंमत आहे का ? केवळ हिंदूंना लक्ष्य केले जाते. सध्याचे सरकार हिंदूंच्या समर्थनाने निवडून आले आहे.

रोहिंग्या घुसखोरांना बांगलादेशाने थारा न दिल्याने भारतानेही त्यांना सामावून घेऊ नये !- सूर्यकांत केळकर, संस्थापक आणि राष्ट्रीय संघटन मंत्री, भारत रक्षा मंच

बांगलादेशी घुसखोरी विरुद्ध भारत रक्षा मंचाने काम चालू केले. आसाममध्ये एन्.आर्.सी. (राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रिया) च्या प्रक्रियेतील त्रुटी दूर करून सरकारने ती प्रकिया संपूर्ण देशात लागू करावी आणि घुसखोरांना देशातून बाहेर काढावे.

उत्तरप्रदेशमधून एका घुसखोर रोहिंग्याला अटक

देशात सहस्रो रोहिंग्या मुसलमानांनी घुसखोरी केली असतांना एकाला अटक करण्यातून काय साध्य होणार ? घुसखोरांना बनावट कागदपत्रे सिद्ध करण्यासाठी साहाय्य करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांचाही शोध घ्या आणि त्यांना देशद्रोही घोषित करून आजन्म कारागृहात टाका !

रोहिंग्या आणि आतंकवाद्यांना अर्थपुरवठा यांप्रकरणी उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाच्या धाडी

रोहिंग्या आणि आतंकवाद्यांना अर्थपुरवठा यांप्रकरणी उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने राज्यातील गोरखपूर, खलीलाबाद, अलीगड, बस्ती, आणि अन्य काही जिल्ह्यांमध्ये धाडी घातल्या.

बांगलादेशने १ सहस्र ७७६ शरणार्थी रोहिंग्यांची केली बेटावर रवानगी !

हे बेट भूभागापासून ३४ कि.मी.वर अंतरावर आहे. हे बेट पावसात नेहमी बुडून जात असल्याने बांगलादेशने बेटावर तटबंदी केली आहे. यासह तेथे घरे, रुग्णालये, मशिदीही बांधल्या आहेत.