बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान स्विगी, झोमॅटो, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट येथे वितरक म्हणून काम करतात ! – Union Minister Giriraj Singh

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचा दावा !

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

नवी देहली – भारतात घुसखोरी केल्यानंतर बांगलादेशी मुसलमान आणि रोहिंग्या मुसलमान सर्वप्रथम स्विगी, झोमॅटो, अमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी सेवा उद्योगांमध्ये वितरक (डिलिव्हरी बॉय) म्हणून म्हणून काम करू लागतात.

सेवा उद्योगाशी संबंधित सर्व आस्थापनांंनी याकडे काटेकोर लक्ष देण्याची आणि कोणतीही माहिती मिळताच पोलिसांना कळवणे आवश्यक आहे, असे आवाहन केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत हे आवाहन केले आहे.

संपादकीय भूमिका

केंद्रीय मंत्र्यांना जी माहिती मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना, गुप्तचरांना का मिळत नाही ? अशांचा शोध घेऊन त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे का ?