अमरावती येथे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने केवळ दुपारी ३ वाजेपर्यंतच खुली !

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदीच्या काळात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत; मात्र अमरावती येथे शहरातील नागरिकांची गर्दी अल्प होत नसून रुग्णही वाढत आहे.

सांगली महापालिकेच्या सर्व कार्यालयांत प्रत्यक्ष टपाल स्वीकारणे बंद !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कार्यालयांत नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महापालिकेच्या सर्व कार्यालयांत प्रत्यक्ष टपाल स्वीकारणे बंद करण्यात आले आहे.

शिरोली येथे हिंदुत्वनिष्ठांनी उभारली सामूहिक गुढी ! 

गेल्या ४ वर्षांपासून शिरोली आणि मत्तीवडे येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकारानेे सामूहिक गुढी उभारण्यात येते. तेथील स्थानिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी सामूहिक गुढीची परंपरा चालू ठेवली.

संचारबंदीचे उल्लंघन करून कराटेचा वर्ग चालवणार्‍या शिक्षिकेला पोलिसांनी केला दंड !

तहसीलदार ज्योती देवरे आणि पोलीस निरीक्षक घनःश्याम बळप यांनी ठिकठिकाणी फिरून गर्दी असलेल्या ठिकाणांवर जाऊन कारवाई केली. 

रेठरे बुद्रुक (जिल्हा सातारा) येथील रुग्णाचा मृत्यू लसीमुळे नव्हे, तर उच्च रक्तदाबामुळे 

जाधव यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर उच्च रक्तदाबामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली. 

निधन वार्ता

सोलापूर येथील सनातनच्या साधिका सौ. मीना नकाते यांच्या आई सुशिला नागनाथ साळुंके (वय ९१ वर्षे) यांचे १६ एप्रिल या दिवशी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.

गुढी हा आमचा धर्म, धर्माचरण आणि धर्माभिमान आहे ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ४० दिवस पापी औरंगजेबाचे अत्याचार सहन केले; पण त्यांनी हिंदु धर्म सोडला नाही म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन नव्हे, तर त्यांचा शौर्यदिन आम्ही मानतो.

गल्लीत ११ रुग्ण आढळल्याने परिसरात प्रवेश बंदी !

एका गल्लीत कोरोनाचे ११ रुग्ण आढळल्याने तेथे १४ दिवसांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. येथील नागरिकांना नगरपालिकेच्या वतीने मूलभूत सोयीसुविधा पोचवण्यात येणार आहेत.

हरिद्वार येथे वादळीवार्‍यामुळे मोठ्या प्रमाणात हानी

कुंभक्षेत्रातील संत आणि भक्त यांच्या निवासस्थानाचीही हानी झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वटवृक्ष मंदिरात स्वामींचा प्रकटदिन साधेपणाने साजरा !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाचे आदेश पाळत ‘देऊळ बंद’ ठेवल्यामुळे भाविकांची अनुपस्थिती होती.