आदेशाचे उल्लंंघन करून चालू असलेल्या व्ही.एल्.सी.सी. वेलनेस अँड ब्युटी सेंटर वर पोलिसांची कारवाई !

डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडारकर रस्त्यावरील व्ही.एल्.सी.सी. अँड ब्युटी सेंटर हे सलून चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावर धाड टाकल्यावर ग्राहकांची अपॉइंटमेंट (वेळ घेऊन) तेथे सेवा चालू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तात्काळ करून घेण्याचे सोलापूर जिल्हाधिकार्‍यांचे आदेश !

सुरक्षितता आणि अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याविषयी त्रयस्थ ऑडिट करून घ्यावे, तसेच दोन्ही यंत्रणा सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र शहरामध्ये मनपा आयुक्त यांच्याकडे, तर ग्रामीणमध्ये उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करावे.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि जय हिंद फूड बँक यांच्या सहकार्याने गरजू लोकांसाठी अन्नदान सेवा !

अक्कलकोट शहर आणि परिसरातील निराधार अन् गरजू लोकांना एक वेळचे जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयातील ३ परिचारिकांवर ५० रुग्णांच्या सेवेचा भार !

गेल्या वर्षभरातील कोरोनाच्या संसर्गामुळे येथील घाटी रुग्णालयात रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्या तुलनेत परिचारिकांची संख्या अल्प असल्यामुळे सध्या कार्यरत परिचारिकांवर कामाचा ताण वाढला आहे.

कोरोना लसीकरण झालेल्या विक्रेत्यांनाच महापालिकेकडून घरपोच विक्री करण्यासाठी ‘पास’

ज्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा अल्प आहे, त्यांची ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी ‘निगेटिव्ह’ असेल त्यांनाच घरपोच विक्रीसाठी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून ‘पास’ देण्यात येणार आहे.

भिगवण येथील अनधिकृत पशूवधगृहावर पोलिसांची धाड !

या कारवाईत पशूवधगृहातील तिघांना कह्यात घेतले असून इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

धान्य वाटपाची थेट अनुमती द्यावी; अन्यथा धान्य वितरण थांबवणार !

अंगठा घेऊन धान्य देण्यासाठी ‘पॉस मशीन’चा उपयोग थांबवत थेट धान्य वाटपाची अनुमती द्यावी; अन्यथा जिल्ह्यातील धान्य वितरण थांबवू, अशी चेतावणी रेशन दुकानदार संघाने दिली आहे.