
सांगली – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कार्यालयांत नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महापालिकेच्या सर्व कार्यालयांत प्रत्यक्ष टपाल स्वीकारणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या कार्यालयांत प्रत्यक्ष न जाता त्यांचे आवेदन, निवेदन आणि पत्र [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण