सातारा येथील ५ सोने दुकानदारांवर कारवाई
केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने चालू ठेवण्याचे आदेश असतांनाही शहरातील ५ सोन्याच्या दुकानदारांनी दुकाने चालू ठेवल्यामुळे त्यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने चालू ठेवण्याचे आदेश असतांनाही शहरातील ५ सोन्याच्या दुकानदारांनी दुकाने चालू ठेवल्यामुळे त्यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोरोनामुळे आर्थिक मंदीची लाट येण्याची शक्यता असून याचा फटका गोरगरीब, कष्टकरी, दैनंदिन काम करून कुटुंब चालवणारे रिक्शावाले, असंघटित कामगार यांना बसणार आहे.
धार्मिक सण, परंपरा, रूढी यांचे विज्ञानीकरण करून नव्हे, तर धर्मशास्त्रानुसार आचरण केले, तर त्याचा आध्यात्मिक लाभ होतो, हे लक्षात घ्या !
येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांनी पूर्णतः भरलेले आहे. त्यामुळे आता तेथे खाटाच शिल्लक नाहीत. रुग्णांना चिकित्सालयाच्या बाहेरच झोपून रहावे लागत आहे. ऑक्सिजनची आवश्यकता असणारे रुग्णही बाहेर बाकड्यावर बसून असतात.
शहरात कोरोनाचे प्रमाण वाढण्याचे कारण ‘विदर्भ स्ट्रेन’ आहे. यामुळे संभाजीनगरसह इतर जिल्ह्यांतही कोरोनाचे नवीन रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासमवेतच मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे.
गृहविलगीकरण नियमांचे उल्लंघन करणार्यांवर सांगली ग्रामीण, पलूस, भिलवडी, कडेगाव अशा विविध ठिकाणी कारवाई करून ५ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिदिन ३ सहस्र ९३३ लोकांची शिवभोजन योजनेद्वारे क्षुधातृप्ती करण्यात येत आहे. केवळ ५ रुपयांत देण्यात येणारे हे भोजन कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘पार्सल’ सेवेद्वारे पुरवण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक व्यवसाय, व्यवहार ठप्प आहेत. यामुळे मजूर, नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी अशा सर्वच वर्गांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
अंत्यविधी आणि दशक्रियाविधी यांना होणार्या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोनाबाधित झाले आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट वतीने २४ घंटे ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली असून भाविकांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा.