शिरोली (जिल्हा कोल्हापूर) – शिरोली पुलाची येथे ग्रामपंचायत प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हिंदुत्वनिष्ठांनी सामूहिक गुढी उभारली. याचे पूजन लोकनियुक्त सरपंच श्री. शशिकांत खवरे (भाऊ) यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवसेना नेते श्री. अनिल खवरे, भाजप तालुकाध्यक्ष श्री. राजेश पाटील, शिरोली उपसरपंच श्री. सुरेश यादव, तंटामुक्त अध्यक्ष श्री. सतीश पाटील, श्री. बाजीराव सातपुते, श्री. प्रल्हाद खवरे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. नितीन चव्हाण, सर्वश्री अर्जुन चौगुले, ज्योतीराम पोरलेकर ग्रामपंचायत सदस्य अविनाश कोळी यांसह अन्य उपस्थित होते.
बेळगाव – मत्तीवडे (तालुका निपाणी) येथे हनुमान आखाडा यांच्या वतीने हनुमान तालीमजवळ सामूहिक गुढीपूजन करण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री किरण चव्हाण, दशरथ डोंगळे, चेतन चव्हाण, अक्षय पाटील, अर्जुन डोंगळे, चीनु कुळूवमोडे, नामदेव साठे, अमृत राजगिरे, अंकुश बेडगे यांसह हनुमान आखाड्यातील तरुण उपस्थित होते.
गेल्या ४ वर्षांपासून शिरोली आणि मत्तीवडे येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकारानेे सामूहिक गुढी उभारण्यात येते. यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते तिथे जाऊ शकले नाहीत; मात्र तेथील स्थानिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी सामूहिक गुढीची परंपरा चालू ठेवली. |