दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : राज्यांतर्गत पीकस्पर्धांचे आयोजन; वाहनतळासाठी भरावे लागते लाखो रुपयांचे भाडे !

स डेपो आणि वाहनतळ यांसाठी ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’ला (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला) ३ ठिकाणी जागांची आवश्यकता आहे. या संदर्भात ‘पी.एम्.आर्.डी.ए.’कडे (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे) पत्रव्यवहारही झाला आहे;

दोडामार्ग तालुक्यात हत्तीकडून मोठी हानी : शेतकरी धास्तावले

तालुक्यातील वीजघर आणि घाटीवडे परिसरात हत्तीचे आगमन झाले आहे. या हत्तीने येथील ४ – ५ शेतकर्‍यांच्या केळी, सुपारी आणि माड यांच्या बागायतींची मोठी हानी केली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेच्या कार्यवाहीतील त्रुटी उघड !

सरकारने विद्यार्थ्यांना विनामूल्य दिलेले गणवेश चुकीच्या मापाचे असल्याने शाळेत पडून !

पूज्‍य साध्‍वी ऋतुंभरा यांच्‍या श्रीमद़्‍भागवत कथेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

पूज्‍य साध्‍वी ऋतुंभरा यांच्‍या खारघर येथे आयोजित ‘श्रीमद़्‍भागवत’ कथेला भाविकांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभत आहे. खारघर येथील ‘श्रीमती राजकुमारी आणि जगदीश प्रसाद कसेरा वेल्‍फेअर ट्रस्‍ट’च्‍या वतीने या कथेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

धरणगाव येथे ‘अखंड नामजप यज्ञ’ सप्‍ताह उत्‍साहात !

येथील श्री स्‍वामी समर्थ सेवा केंद्र येथे ९ ते १६ डिसेंबर या कालावधीत दत्तजयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ प्रहरे गुरुचरित्र पारायण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.

विषारी मद्यविक्रीच्या विरोधात कारवाई न केल्यास आत्मदहन करणार ! – सुरेश सावंत, माजी सभापती, पंचायत समिती, कणकवली

जिल्ह्यात गोवा बनावटीच्या विषारी मद्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. जिल्ह्यात होणारी विषारी मद्याची विक्री तात्काळ थांबवावी, अन्यथा कार्यालयासमोर आत्मदहन करू…

लाचप्रकरणी गुन्हा नोंद झालेले न्यायाधीश निकम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

जामीन आवेदनाविषयी साहाय्य आणि तो संमत करून देण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वर्ग ३ धनंजय निकम यांच्यासह चौघांवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

पुरुषार्थ जागृतीसाठी बजरंग दलाचे मुंबईत शौर्य संचलन !

‘गीता जयंती’चे औचित्य साधून बजरंग दल शौर्य दिवसाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. या वर्षी बजरंग दलाच्या वतीने कोकण प्रांतात एकूण ४ ठिकाणी शौर्य संचलन/यात्रांचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीसिद्धिविनायक मंदिरातील विश्वस्तांच्या संख्येत वाढ, कार्यकाळही वाढवला !

मुंबईतील प्रभादेवी येथील स्वयंभू आणि प्रसिद्ध श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्तांची संख्या ९ वरून १५ इतकी करण्याचा, तसेच विश्वस्त समितीचा कालावधी ३ ऐवजी ५ वर्षे करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

शेवगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथे दत्त जयंती उत्साहात साजरी !

सुप्रसिद्ध अष्टांग योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेवगावच्या वैशंपायननगर येथील दत्तभूमीत दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.