‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिके’चा गोदाम म्हणून वापर !

सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे महापालिकेने ३ कोटी रुपये व्यय करून ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका’ उभारली आहे. त्याचा वापर अभ्यासिका म्हणून न करता इतर साहित्य ठेवण्याचे गोदाम म्हणून केला जात आहे.

छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांची विटंबना करणार्‍या धर्मांधावर त्वरित कारवाई करण्याची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? विटंबना करणार्‍या धर्मांधावर पोलिसांनी स्वतःहून कठोर कारवाई करणे अपेक्षित !

चांगल्या परताव्याचे आमीष दाखवून ३५० माजी सैनिकांची फसवणूक !

आयुष्यभर देशरक्षण करणार्‍या माजी सैनिकांवर आंदोलनाची वेळ येणे याहून दुसरे दुर्दैव कोणते ?

श्री देव रामेश्वराने कौल दिला आणि आचरावासीय गावात परतले !

तालुक्यातील संस्थानकालीन आचरा गावच्या ‘गावपळण’चा प्रारंभ १५ डिसेंबर या दिवशी झाला होता. ३ दिवस आणि ३ रात्री पूर्ण झाल्यावर गावात परत येण्यासाठी १८ डिसेंबर या दिवशी दुपारी श्री देव रामेश्वराला कौल लावण्यात आला..

‘धर्मजागरण ट्रस्ट’च्या वतीने २० ते २९ डिसेंबर या कालावधीत ‘श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रा’ !

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्तीच्या डोंगरावर श्री रेणुकामातेची यात्रा होते. अनेक भाविकांना यात इच्छा असूनही सहभागी होता येत नाही. अशा भक्त-भाविक यांच्यासाठी ‘धर्मजागरण ट्रस्ट’च्या वतीने २० ते २९ डिसेंबर या कालावधीत ‘श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रे’चे आयोजन केले आहे.

हिर्लोक गावातील एका घरात अघोरी कृत्याच्या संशयाने खळबळ : ५ जणांना पोलीस कोठडी

घरात मोठा खड्डा, तसेच लिंबू, चामड्याची चप्पल, कवड्या, बिब्बे, कोयता, सुरी आदी साहित्य सापडले !

बुचर आयलंडजवळ प्रवासी बोट बुडाली, १३ जणांचा मृत्यू !

बुचर आयलंडजवळ १८ डिसेंबर या दिवशी दुपारी ‘नीलकमल’ नावाची फेरी बोट बुडाली असून त्यावरील १०१ जणांना वाचवण्यात आले आहे, तर १३ जणांचा मृत्यू झाला.

सोने तस्करांना साहाय्य करणार्‍या विमानतळाच्या ३ कर्मचार्‍यांसह ६ जणांना अटक !

विमानतळामधून सोने बाहेर काढून देण्यासाठी सोने तस्करांना साहाय्य करणार्‍या विमानतळाच्या ३ कर्मचार्‍यांसह ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

शेरीनाला मलशुद्धीकरण प्रकल्पास तातडीने प्रशासकीय मान्यता द्या !

कृष्णा नदीच्या पात्रात शेरीनाल्याचे पाणी मिसळून प्रदूषण होते, ते रोखण्यासाठी नवीन प्रस्तावित मलशुद्धीकरण प्रकल्पास तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

काळम्मावाडी धरणाच्या गळतीवर सरकारने तातडीने उपाययोजना करावी ! – सतेज पाटील, आमदार, काँग्रेस

काळम्मावाडी धरणाला मागील २ वर्षे गळती चालू असून सध्या प्रतिसेकंद २७७ लिटर इतके पाणी वाया जात आहे. अत्यंत गंभीर सूत्रावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.