यावल (जिल्हा जळगाव) – येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. भारतीय स्टेट बँके जवळील शनिदेव मंदिरापासून यावल पोलीस ठाण्याच्या समोरून मिरवणूक ाजत असतांना, तसेच पोलीस बंदोबस्त असतांना बुरुज चौकाजवळ आणि शहरातील मुख्य मार्गावरील महाजन टी डेपोजवळ धर्मांधांनी अयोग्य पद्धतीने घोषणा देत मिरवणुकीला विरोध केला. या प्रकरणी पोलिसांनी धर्मांधावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणी अद्याप कुणावरही कारवाई झालेली नाही.
संपादकीय भूमिकान्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवत मशिदींवर अनधिकृत भोंगे वाजवून वर शिवजयंतीच्या मिरवणुकीला विरोध करणारे उद्दाम धर्मांध ! हिंदूंच्या प्रत्येक सण-उत्सवाच्या वेळी काहीतरी कुरापती काढून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्या धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना, हाच एकमेव उपाय आहे ! |