सावंतवाडी – ई-पीक नोंदणीची आयत्या वेळी सक्ती न करता जुन्या सातबाराच्या आधारावर शेतकर्यांना सरसकट फळ पीक विमा योजनेचा लाभ द्या. कुणालाही लाभापासून वंचित ठेवू नका. विम्याचा लाभ देण्यास काही अडचणी असतील, तर आताच सांगा, आपण थेट आयुक्तांशी बोलू; मात्र शेतकरी आणि बागायतदार यांची हानी होणार नाही, याची काळजी घेऊया, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे माहीम, मुंबई येथील आमदार महेश सावंत यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली. ‘एकही शेतकरी विमा योजनेपासून वंचित राहिल्यास शिवसेना (ठाकरे गट) पक्ष आंदोलन करेल’, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली.

फळ पीक विमा योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकर्यांसाठी २२ एप्रिल या दिवशी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार पाटील यांची भेट घेण्यात आली. या वेळी विमा आस्थापनांचे अधिकारी, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार सावंत यांनी या वेळी उपस्थित विमा आस्थापनाच्या अधिकार्यांना खडसावले.
या वेळी तहसीलदार पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तालुक्यातील विमा योजनेस पात्र शेतकरी आणि बागायतदार या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी सकारात्मक प्रयत्न करा, अशा सूचना त्यांनी संबंधित विमा आस्थापनांच्या अधिकार्यांना दिल्या.
पन्हाळा ते पावनखिंड ७५ व्या अमृत महोत्सवी मोहिमेस प्रारंभ !
‘मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प’ साकारण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन !
‘द्विपक्षीय राजकीय प्रणाली’साठी घटनादुरुस्ती करा ! – अजय सिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना
राज्यातील १०३ विधी महाविद्यालयांना ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ची मान्यता नाही !
‘फेसबुक’वरील ओळखीतून महिलेचा नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील व्यक्तीला लाखो रुपयांचा गंडा !
दौंड (पुणे) येथे नकली मद्य सिद्ध करणार्या चौघांना अटक !