Akhil Bharatiya Adhivakta Parishad Goa : पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचा अधिवक्त्यांच्या वतीने निषेध

ज्येष्ठ अधिवक्ता तथा परिषदेचे अध्यक्ष संतोष रिवणकर आणि इतर पदाधिकारी

पणजी, २३ एप्रिल (वार्ता.) – पहलगाम येथे हिंदु पर्यटकांवर झालेल्या आक्रमणाचा अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या गोवा प्रांताच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या वेळी ज्येष्ठ अधिवक्ता तथा परिषदेचे अध्यक्ष संतोष रिवणकर आणि इतर पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. अध्यक्ष संतोष रिवणकर म्हणाले, ‘‘आतंकवाद्यांनी एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करून केलेल्या आक्रमणाचा निषेध करण्यासाठी आम्हाला एकत्र येऊन त्याचा निषेध करावा, असे वाटले.

यापुढे आम्ही भारतीय नागरिक अशा घटना कदापि खपवून घेणार नाही आणि हे आक्रमण अखेरचे ठरावे, असा संदेश आम्हाला यातून द्यायचा आहे. सरकारने याविरोधात कठोर कारवाई करून भारतभर फिरणार्‍या भारतियांना सुरक्षितता पुरवावी. राज्यघटनेवर बोलणार्‍यांनी आता पुढे येऊन अशा आतंकवादी आक्रमणावर भाष्य करून सरकारला पाठिंबा दर्शवावा.