‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या फोंडा, गोवा येथील कार्यक्रमस्थळी पार पडला स्तंभरोपण विधी !

स्तंभरोपण करतांना डावीकडून सौ. वेदश्री खानविलकर, सौ. अक्षता रेडकर, सौ. वैजयंती कुमार, सौ. गायत्री शास्त्री, सौ. नंदिनी चितळे, सौ. वर्धिनी गोरल आणि सौ. निशिगंधा नाफडे

फोंडा (गोवा), २२ एप्रिल (वार्ता.) – सप्तर्षींच्या आज्ञेने २२ एप्रिल २०२५ ला सकाळी ६.३० वाजता श्रवण नक्षत्राच्या मुहूर्तावर ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या येथील कार्यक्रमस्थळी स्तंभरोपण विधी पार पडला. या विधीद्वारे कार्यक्रमस्थळी मंडप उभारणे इत्यादी सेवांना प्रारंभ झाला. भूमीची शुद्धी व्हावी आणि शुभमुहूर्तावर कार्यारंभ व्हावा, या उद्देशांनी हा विधी करण्यात आला.

आरंभी पुरोहित श्री. अमर जोशी आणि श्री. श्रेयस पिसोळकर यांनी श्री गणपति पूजन केले. त्यानंतर ७ सुवासिनींनी खड्ड्यामध्ये सप्तधान्य अर्पण केले आणि कोवळ्या बांबूचे रोपण केले. यानंतर स्तंभाचे (बांबूचे) भावपूर्ण पूजन करण्यात आले.