गीतांजली एक्सप्रेसमधील उपाहारगृह कर्मचार्यांचा उद्दामपणा !
कल्याण – गीतांजली एक्सप्रेसने प्रवास करणारे सत्यजीत बर्मन यांनी अधिकचे पैसे घेऊन अल्प खाद्यपदार्थ दिल्याविषयी उपाहारगृह कर्मचार्याला जाब विचारला. संतप्त कर्मचार्यांनी त्यांच्यावर आक्रमण करत त्यांना उपाहारगृहाच्या कक्षात डांबले. बर्मन यांचा कल्याणपर्यंतचा प्रवास झाल्यावर त्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे येथे तक्रार केली. याची नोंद घेत उपाहारगृह चालवणार्या आस्थापनाच्या ७ कर्मचार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.
सहप्रवाशाने १३९ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार केल्यानंतर अकोला रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी बर्मन यांची सुटका केली. या प्रकरणी सत्यजीत बर्मन यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.