पंचमहाभूत लोकोत्सवाचे जनआंदोलनात रूपांतर करून सकारात्मक पालट घडवूया ! – आचार्य देवव्रत, राज्यपाल, गुजरात

भारतात पाण्याचेही पूजन केले जाते. गंगामातेचे पूजन केले जाते. त्यामुळे पाण्याचा दुरुपयोग होऊ देऊ नका अन्यथा पृथ्वी आपल्याला कदापि क्षमा करणार नाही.

समाजातील ढासळती नीतीमत्ता रोखण्यासाठी ‘धर्मशिक्षण आणि धर्माचरण’ हाच उपाय ! – श्रीमती मधुरा तोफखाने, हिंदु जनजागृती समिती

समर्थभक्त माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने आयोजित ‘महाशिवरात्र कीर्तन महोत्सवा’त त्या ‘धर्मशिक्षण ही काळाची आवश्यकता’ या विषयावर बोलत होत्या.

पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा साधू-संतांचा निर्धार !

केवळ देशपातळीवर नाही, तर जागतिक पातळीवर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत आहे. त्यामुळे आपण आता जागे झालो नाही, तर यापुढील काळ आणि पिढी आपल्याला क्षमा करणार नाही.

विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने महाशिवरात्रीला पावनगड पन्हाळा येथे महाअभिषेक; गोरक्षकांचे सत्कार !

विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने महाशिवरात्रीला पावनगड पन्हाळा येथे भजन, जागर, महाअभिषेक, गोरक्षकांचे सत्कार, असे विविध कार्यक्रम पार पडले. समाधी मठाचे पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला.

कोहिनूर हिरा ब्रिटिशांच्या गडद क्रूर वसाहतवादी इतिहासाचे प्रतिनिधित्व करतो !

पत्रकार नरिंदर कौर यांनी कोहिनूर हिर्‍यासंदर्भात मांडलेल्या स्पष्ट भूमिकेसाठी त्या अभिनंदनास पात्र आहेत. आर्थिकदृष्ट्या ब्रिटनला मागे टाकणार्‍या भारताने आता कोहिनूर हिरा परत करण्यास ब्रिटनला भाग पाडले पाहिजे !

महाशिवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने धनबाद येथे ३ दिवसांचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम आणि सामूहिक नामजप पार पडला !

कार्यक्रमात शिवाचा सामूहिक नामजप करतांना एका महिला जिज्ञासूला ‘सामूहिक नामजप करतांना शिवाच्‍या चरणाशी बसले आहे’, असे तिला जाणवले.

‘पंचमहाभूत लोकोत्सवाच्या’ माध्यमातून सर्वांनी पर्यावरणजागृतीसाठी कृतीशील व्हावे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंचमहाभूत लोकोत्सव प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ यांनी पाहिला पाहिजे आणि त्यातून कृतीशील व्हायला पाहिजे !

झाडगाव (रत्नागिरी) येथे २३ फेब्रुवारीपासून वेदशाळा आणि संस्कृत पाठशाळेत धार्मिक कार्यक्रम

वेद आणि शास्त्र या विषयातील २ दिग्गज (कै.) विनायक आठल्येगुरुजी अन् व्याकरणाचार्य (कै.) पु.ना. फडकेशास्त्री यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ झाडगाव येथील संस्कृत पाठशाळेमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन !

समस्त हिंदूंनी जातपात विसरून राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान द्यावे ! – योगऋषी रामदेवबाबा

पतंजलि योगपीठ आणि श्रीदत्त पद्मनाभ पीठ यांच्यामध्ये अतूट असे नाते निर्माण झाले आहे. हिंदु धर्म, संस्कृती आणि सनातन धर्मातील विविध घटक यांना संघटित करण्याचे महान कार्य पद्मश्री प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज करत आहेत.

‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’च्या लढाऊ विमानावर पुन्हा लावण्यात आले श्री हनुमंताचे चित्र !

बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या आशियातील सर्वांत मोठ्या ‘हवाई कवायतीं’च्या कार्यक्रमात ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’च्या अर्थात् ‘हॉल’च्या लढाऊ विमानावर पुन्हा श्री हनुमंताचे चित्र लावल्याचे दिसून आले.