पंतप्रधान मोदी यांच्या १०० व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे राज्यभर प्रक्षेपण करणार ! – भाजप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१४ मध्ये देशाची सूत्रे हाती घेताच प्रत्येक मासाच्या शेवटच्या रविवारी देशवासियांशी संवाद साधण्यासाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमास प्रारंभ केला. येत्या रविवारी त्याचा १००वा भाग प्रक्षेपित होत आहे त्या निमित्ताने . . .

विश्रामबाग येथील स्‍वातंत्र्यवीर सावरकर शाळेत उन्‍हाळी शिबिराचे आयोजन !

विश्रामबाग येथील स्‍वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्‍ठान प्रशाला आणि ‘शोतोकॉन कराटे-दो फेडरेशन ऑफ महाराष्‍ट्र’ या संस्‍थेच्‍या वतीने १ ते ११ मे असे १० दिवस उन्‍हाळी व्‍यक्‍तिमत्त्व शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे.

राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास गोवा सज्ज !

३७ व्या राष्ट्रीय खेळांच्या आयोजनासाठी गोवा सज्ज आहे. या स्पर्धांसाठी लागणार्‍या पायाभूत सुविधा आधीच सिद्ध आहेत. राहिलेली किरकोळ कामे १५ जुलैपर्यंत पूर्ण होतील, असे गोव्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

सनातन धर्माला मनुष्यासह प्राणीमात्राचीही चिंता ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

जर संप्रदायांच्या शिक्षणासमवेत सनातन धर्म आणि शास्त्र यांच्या मूलभूत गोष्टी शिकवण्यात आल्या, तर आपण सनातन धर्माशी जोडलेले राहू. आज कुटुंब, मंदिर, गुरुकुल आणि विश्वविद्यालय यांच्या माध्यमातून हिंदु धर्माचे शिक्षण मिळणे आवश्यक !

१ मेपासून विसावा मंडळाच्‍या ‘शिवोत्‍सव २०२३’ला प्रारंभ !

गेली ३६ वर्षे सातत्‍याने साजरा होणारा विसावा मंडळाचा शिवोत्‍सव १ मे या दिवशी प्रारंभ होत आहे.

गोवा राज्य विदेशी मंत्र्यांच्या ‘एस्.सी.ओ.’ बैठकीसाठी होत आहे सिद्ध !

‘एस्.सी.ओ.’ गटामध्ये रशिया, भारत, चीन, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गीझस्तान, तजाकिस्तान आणि उजबेकिस्तान या ८ सदस्यांचा समावेश आहे. याचे अध्यक्षपद सप्टेंबर २०२२ मध्ये भारताला मिळाले. ही बैठक बाणावली येथे होणार आहे.

‘स्वयंपूर्ण’ गोव्याच्या निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

साळगाव पंचायतीत ‘स्वयंपूर्ण मित्र’ या नात्याने राज्यातील पंचायती आणि पालिका यांच्याशी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना हे आवाहन केले.

मॉरिशस येथे होणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण !

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मॉरिशस येथे लोकार्पण करण्यात येणार आहे. २८ एप्रिल या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

गोवा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज विकलांगांसाठी ‘व्हीलचेअर सुलभ ई-रिक्शा’चे लोकार्पण होणार

विकलांगांना कामाचे ठिकाण, रुग्णालये, शाळा आणि इतर ठिकाणी प्रवास करण्यासाठी या सुविधेचा लाभ होणार आहे. या रिक्शाचा मागचा दरवाजा ‘रॅम्प’मध्ये रूपांतरित होत असल्याने विकलांगांना रिक्शात चढ-उतार करणे सुलभ होणार आहे.

योग्य ज्ञान आणि संस्कार मिळण्यासाठी पुन्हा संयुक्त कुटुंब पद्धतीकडे वळले पाहिजे ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा

कीर्तन हा ईश्वरी भक्तीचा सर्वोत्तम मार्ग आहे. कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी ईश्वरी साधना आणि भक्ती करणे, ही काळाची आवश्यकता आहे. ज्ञानदान हे केवळ शाळेतच नाही, तर मठ, मंदिरे यांतूनही होते, हे आपण दाखवून दिले आहे.