‘संगम टॉक्स’ च्या माध्यमातून आम्ही हिंदु धर्मावरील आघातांना वाचा फोडत आहोत ! – श्रीमती तान्या मनचंदा, संपादक, संगम टॉक्स

आमच्या पिढीला विशेषतः शहरी युवकांना धर्मशिक्षण दिले गेले नाही, हे आमचे दुर्भाग्य आहे; परंतु ‘संगम टॉक्स’ या यू-ट्युब वाहिनीच्या (‘चॅनेल’च्या) माध्यमातून युवकांना आम्ही हिंदुत्वाविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहोत. असे मत त्यांनी व्यक्त केले

मालेगाव येथे मसगा महाविद्यालयात मौलवीकडून हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न !

महाविद्यालयाला हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा अड्डा बनवणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! विविध माध्यमांतून हिंदूंच्या धर्मांतराचे उघडउघड षड्यंत्र रचले जात असल्याने धर्मांतरबंदी कायदा होणे अपरिहार्य आहे !

छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून पुढील पिढीला सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे आपले धर्मकर्तव्य ! – विपुल भोपळे, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून हिंदूंना सुरक्षित केले. त्यांना स्वाभिमान मिळवून दिला. याचाच आदर्श घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होऊन पुढच्या पिढीला सुरक्षित आणि स्वाभिमानी वातावरण निर्माण करून देणे, हे आपले धर्मकर्तव्य आहे.

पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा नष्ट करून नवीन गोवा सिद्ध करा !

बेतुल किल्ल्यावर ६ जून या दिवशी आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे आवाहन केले.

मी परदेशात जाऊन राजकारण करत नाही ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

मी परदेशात जाऊन राजकारण करत नाही आणि यापुढेही करणार नाही, असे उत्तर परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे एका तरुणाने विचारलेल्या प्रश्‍नाला दिले. या तरुणाने राहुल गांधी यांचे नाव न घेता ‘अमेरिकेतील काही लोक भारताविषयी वक्तव्ये करत आहेत.

भारतातील इस्लाम सर्वांत सुरक्षित ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘इस्लाम खतरे में है’, अशी बांग ठोकणारे धर्मांध मुसलमान नेता, तसेच ‘भारतात मुसलमान असुरक्षित जीवन जगत आहेत’, अशी आवई उठवणारे महाभाग यांना यावरून जाब विचारला पाहिजे !

‘सरकारच्या विरोधात बोलल्याने अस्तित्वच नष्ट केले जाते !’ – राहुल गांधी

विदेशात जाणूनबुजून भारताची प्रतिमा मलिन करणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

खलिस्तानसाठी जनमत संग्रह घेणारा कार्यक्रम ऑस्ट्रेलिया सरकारकडून रहित !

भारताशी संबंध सुदृढ होण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या ऑस्ट्रेलियाला तेथील भारतविरोधी शक्तींचा नायनाट करण्यासाठी आता कटीबद्ध व्हावे, असे भारताने त्याला सांगणे आवश्यक !

हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे ! – गोविंद चोडणकर, गोवा

लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशांसारख्या हिंदूंवरील आघातांच्या विरोधात उपाययोजना म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन आपली रणनीती ठरवली पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व समस्यांवर मूळ उपाय म्हणून हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रखर विचार युवा पिढीपर्यंत पोचवणे हे आपले दायित्व ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र

मॉरिशस येथे सावरकर यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. २८ मे या दिवशी मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मंत्री चव्हाण यांच्या हस्ते या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला.