मिरज, ३० एप्रिल (वार्ता.) – मिरज विद्यार्थी संघाच्या ९८ व्या वसंत व्याख्यानमालेस २ मेपासून प्रारंभ होत आहे. १५ मे पर्यंत चालणार्या या व्याख्यानमालेचे उद्घाटन २ मे या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे. या व्याख्यानमालेत पहिले व्याख्यान राहुल नार्वेकर यांचे ‘संसदीय लोकशाहीत विधीमंडळाच्या सभापतींचे स्थान आणि परंपरा’ यावर होणार असून त्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे उपस्थित रहाणार आहेत.
३ मे या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथील बाबा भांड यांचे ‘दानशूर आणि सार्वभौम राजा महाराजा सयाजीराव गायकवाड’ या विषयावर,
४ मे या दिवशी पुणे येथील श्री. प्रमोद करजगी यांचे ‘महान मराठा सेनानी महादजी शिंदे’,
५ मे या दिवशी निवृत्त न्यायमूर्ती श्रीमती मृदूला भाटकर यांचे ‘गोष्टी पुराव्याच्या’,
६ मे या दिवशी आंतकवादविरोधी पथकाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचे ‘माणसातील पोलीस आणि पोलिसातील माणूस’ या विषयावर,
७ मे या दिवशी ‘डि.आर्.डी.ओ.’चे निवृत्त संचालक व्यंकटेश परळीकर यांचे ‘आत्मनिर्भर भारताचा संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील स्वदेशी प्रवास’ या विषयावर,
९ मे या दिवशी मेजर जनरल संजय भिडे यांचे ‘पाकव्याप्त काश्मीर -एक आव्हान’,
१२ मे या दिवशी अधिवक्ता नितीन माधव आपटे यांचे ‘३७० पूर्वीचा काश्मीर आणि आजचा काश्मीर’,
१३ मे या दिवशी ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांचे ‘कालातीत सावकर’,
१४ मे या दिवशी प्रा. सचिन कानिटकर यांचे ‘भीमरूपी जन्मकथा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
ही सर्व व्याख्याने खरे मंदिराच्या ‘मुक्तांगण सभागृहात’ सायंकाळी ६.४५ वाजता होणार आहेत. तरी अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष डॉ. मुकुंदराव पाठक यांनी केले आहे.