शेवगाव (जिल्हा नगर) – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वेळी मिरवणूक आणि प्रार्थनास्थळ यांवर दगडफेक झाल्याचा प्रकार १४ मे या दिवशी घडला आहे. जमावाने दुकाने आणि वाहने यांची हानी करून काही प्रमाणात जाळपोळही केली. पोलिसांना लाठीमार करावा लागला. या सर्व प्रकरणात ४ पोलीस घायाळ झाले . पुढील ४ दिवस जमावबंदी लागू करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचा विचार चालू आहे.
Viral Video – अकोल्यानंतर शेवगावमध्ये दंगल, छत्रपती संभाजीमहाराजांच्या मिरवणुकीदरम्यान गोंधळ; तुफान दगडफेक, गाड्यांची तोडफोड pic.twitter.com/m6KWmVm3d9
— Saamana (@SaamanaOnline) May 15, 2023
तणाव निर्माण झाल्यामुळे परिसरातील दुकानदारांनी आपापली दुकाने तात्काळ बंद केली. काही दुकानांवरही आक्रमण करत तोडफोड करण्यात आली. या वेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन पावले उचलत आहे, असे प्रांताधिकारी प्रसाद मते आणि उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले.