Hate Speech ‘अराष्ट्रीय’ घटनांना हेतूपुरस्सर ‘जातीय सलोख्या’शी जोडण्याचा प्रयत्न ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

सर्व ‘अराष्ट्रीय’ घटनांची सरमिसळ जातीय सलोख्याशी मुद्दाम हेतूपुरस्सर का केली जात आहे ? अराष्ट्रीय कृत्यांना विरोध झालाच पाहिजे. हिंदु समाजाला लक्ष्य करून राजकारण प्रभावी मंचावर टाळ्या मिळवण्यासाठी ऊठसूट शिंतोडे उडवणे आता बंद करावे.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना अभिवादन !

पोलीस स्मृतीदिनानिमित्त गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावतांना धारातिर्थी पडलेले देशभरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

मशिदीत आयोजित कार्यक्रमात जमावाने कॅनडाच्या पंतप्रधानांना वापरले अपशब्द !

खलिस्तानी आतंकवाद्यांना वेठीस आणण्याचे धैर्य नसणार्‍या ट्रुडो यांना त्यांच्या देशातील मुसलमान नागरिकही जुमानत नाहीत, यात काय आश्‍चर्य !

ISRO : ‘विक्रम’ आनंदाने झोपी गेला, आता मंगळ आणि शुक्र येथे जाण्याची योजना ! – एस्. सोमनाथ, इस्रो

‘विक्रम’ने (विक्रम लँडरने) चांगले काम केले आहे आणि आता तो चंद्रावर आनंदाने झोपी गेला आहे. भविष्यात जर विक्रमला जागे व्हावे, असे वाटत असेल, तर तो तेव्हा जागा होईलच; पण त्यासाठी आम्हाला वाट पहावी लागेल.

मैसुरू (कर्नाटक) येथे पोलिसांच्या बंदोबस्तात साजरा करण्यात आला ‘महिषा दसरा’ !

हिंदु धर्माच्या विरोधात जाणीवपूर्वक द्वेष पसरवणार्‍यांना महिषासुरच प्रिय असणार, यात काय शंका ? असे लोक समाजात नैतिकता, प्रेम आणि सद्भाव कधीतरी निर्माण करतील का ?

(म्हणे) ‘हिंदु धर्मात शूद्र म्हणजे वेश्येचा मुलगा !’ – प्राध्यापक के.एस्. भगवान 

अशा प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे शिक्षण दिले असेल, याची कल्पनाच करता येत नाही ! शिक्षक नीतीमत्तेचे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांवर संस्कार करत असतो; मात्र येथे असे प्राध्यापक समाजात द्वेष पसरवत आहेत !

Life Skills Course : देशभरातील महाविद्यालयांत चालू होणार ‘जीवन कौशल्य अभ्यासक्रम’ !

केंद्रशासनाने युवा पिढीची स्थिती पाहून अशा प्रकारचा अभ्यासक्रम आणला, हे स्तुत्य पाऊल आहे. यासह युवा पिढीला साधना शिकवून तिच्याकडून ती करून घेतली, तर तिच्या जीवनातील अनेक समस्या ती स्वत: सोडवण्यास सक्षम बनेल !

Pejawar Swamiji : अन्य धर्मीय स्वतः जेथे बहुसंख्य होतात, तेथे धर्मांधतेचे क्रौर्य दाखवतात ! – पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी

प्रभु श्रीराम हे आमच्यासाठी आदर्श असल्यामुळे सहस्रो वर्षे झाली, तरी आम्ही श्रीरामांची आराधना करत त्यांच्या आदर्शांचे पालन करत आलो आहोत; परंतु हे अन्य धर्मीय स्वतः जेथे बहुसंख्य होतात, तेथे धर्मांधतेचे क्रौर्य दाखवतात.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘देव, धर्म आणि देश’ रक्षणाचा आदर्श घेऊन नवा भारत बनवूया ! – डॉ. प्रमोद सावंत

अलीकडे इस्लामी जिहाद आणि वामपंथी देशद्रोही कारवाया करत आहेत. सेवा आणि शिक्षण यांच्या आडून धर्मांतर केले जात आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा पुढे नेऊन हिंदुत्व अखंड ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.

पुस्तकातून विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न ! – डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थराज्यमंत्री

पुस्तकाचे लेखक डॉ. थढानी म्हणाले की, दाभोलकरांच्या हत्येत वापरलेले पिस्तुल हे नंतर ‘सीबीआय’च्या कस्टडीमध्ये आले होते. असे असतांना त्यांच्या कस्टडीतून ते बाहेर निघून कॉ. पानसरे हत्येमध्ये ते कसे काय वापरले जाते आणि पुन्हा कस्टडीत येऊन बसते ? हे सर्व षड्यंत्र आहे.