श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवास कागवाड (जिल्हा बेळगाव) येथे प्रारंभ !

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे पट्टशिष्य-शिष्योत्तम श्री ब्रह्मानंद महाराज यांचा १०५ वा पुण्यतिथी उत्सव शनिवार, ७ ऑक्टोबरपासून श्री ब्रह्मानंद महाराज संस्थान, श्री क्षेत्र नवबाग, कागवाड (जिल्हा बेळगाव) येथे प्रारंभ झाला.

देशात नथुराम गोडसे यांचे नाव घेतलं तरी जगभरात गांधीजींचेच नाव आहे ! – बाबा आढाव

येथील ‘भटक्या विमुक्त प्रतिष्ठा’न संघाच्या कार्यक्रमांमध्ये बोलतांना बाबा आढाव यांनी देशात नथुराम गोडसे यांचे नाव घेतले, तरी जगभरात गांधीजींचेच नाव आहे, त्याचे काय कराल ? असा प्रश्न सत्ताधारी नेत्यांना विचारला.

कर्णावती (गुजरात) येथील शाळेने हिंदु मुलांकडून करून घेतले नमाजपठण !

याऐवजी जर एखाद्या शाळेतील मुसलमान अथवा ख्रिस्ती विद्यार्थ्यांना हिंदु धर्मानुसार उपासना करण्यास सांगण्यात आले असते, तर एव्हाना देशभरात ‘शिक्षणाचे भगवेकरण’, ‘लोकशाहीची हत्या’, ‘अल्पसंख्यांकांवरील अरिष्ट’ अशा प्रकारे आरोळी ठोकत शाळेला वाळीत टाकण्याची धमकी दिली गेली असती, हे जाणा !

भारतात हिंदू बहुसंख्य असतांनाही त्यांची मानसिकता अल्पसंख्यांकांप्रमाणे ! – फ्रान्सुआ गोतिए, फ्रेंच पत्रकार

जे एका विदेशी पत्रकाराला कळते ते निद्रिस्त हिंदूंना कळत नाही, हे दुर्दैव ! ‘असे हिंदू मार खाण्याच्याच लायकीचे आहेत’, असेही कुणी म्हटले, तर चुकीचे ठरू नये !

सिंधुदुर्ग : गौतमी पाटील यांचे जिल्ह्यातील नृत्याचे कार्यक्रम रहित

आयोजकांनी काही कारणांमुळे कार्यक्रम रहित केल्याचे म्हटले असले, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांकडून या अनैतिक कार्यक्रमांना झालेल्या विरोधामुळेच हे कार्यक्रम रहित करावे लागले, अशी चर्चा जिल्ह्यात चालू होती !

गौतमी पाटील यांच्या नृत्याच्या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढता विरोध !

अनेक ठिकाणी कार्यक्रमात हुल्लडबाजी होऊन तोडफोडही झाली असतांना जिल्ह्यातही तसेच होऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी, असे प्रशासनाला अभिप्रेत आहे का ?

एका कार्यक्रमासाठी कर्णकर्कश ध्‍वनीक्षेपक लावल्‍याप्रकरणी महापालिकेवर गुन्‍हा नोंद का झाला नाही ? – मनसे

गणेशोत्‍सवाच्‍या काळात डीजे वाजवण्‍यास बंदी असूनही अनेक जण कर्णकर्कश आवाजात ध्‍वनीक्षेपक आणि डीजे वाजवत आहेत. यामुळे शहरातील २२ गणेशोत्‍सव मंडळांवर पोलिसांनी गुन्‍हे नोंद केले आहेत.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती समारोहात खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदी यांना ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट !

या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीच्यावतीने त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी चर्चा केली. त्यांना समितीचा ‘हलाल जिहाद ?’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ, तसेच हलाल प्रमाणपत्र रहित करण्याच्या प्रक्रियेसंबंधीचे निवेदन देण्यात आले.

पर्यटन व्यवसायामध्ये रोजगार निर्मितीची क्षमता ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा

येत्या ४-५ वर्षात आदरातिथ्य क्षेत्रात सुमारे २ लाख तरुणांना रोजगार देण्याची क्षमता ! ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘व्होकल फॉर ग्लोबल’ या संकल्पनांना चालना देण्यासाठी उद्योग समर्थनाच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला.

गोवा : सरकारच्या ‘टेलीमानस’ योजनेच्या अंतर्गत एका वर्षात १ सहस्र जणांनी केला संपर्क !

केवळ समुपदेशाने मानसिक समस्या सुटणार नाहीत. त्याला अध्यात्माची (साधनेची) जोड देणे आवश्यक आहे. अनेक सोयीसुविधा, भौतिक विकास आदी साध्य करूनही मोठ्या प्रमाणात नागरिक मानसिक रुग्ण का बनत आहेत ?